शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात अल्पवयीन मुलीचा विवाह ऐनवेळी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:53 IST

तहसीलदारांची कारवाई : वधू शिरपूर तर वर नंदुरबारचा

नंदुरबार : अल्पवयीन मुलीचा रविवार, १२ रोजी येथील विमल हॉसिंग सोसायटीमध्ये होणारा विवाह रोखण्यात तहसीलदार व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. मुहूर्ताच्या अवघ्या १५ मिनिटे आधी अधिकारी मंडपात पोहचले. यामुळे वºहाडी मंडळीमध्ये एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहून वधूच्या आईला मानसिक धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.शिरपूर येथील वधू व नंदुरबार येथील वरांचा रविवार, १२ मे रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. तांबोळी-बारी समाजाचे हे जोडपे होते. हळदीचा कार्यक्रमानंतर रविवारी दुपारी १२.३० वाजता विवाह लागणार होता. शनिवारी अज्ञात व्यक्तीने मुलीचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याची तक्रार मंत्रालयात व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार बाळासाहेब थोरात यांना कळविण्यात आले. त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक बांगर, महिला व बालविकास अधिकारी वळवी, मंडळ अधिकारी यांना घेवून विवाहस्थळी गेले. यावेळी विवाहाची सर्व तयारी पुर्ण झाली होती. वरात मंदीरावरून निघाली होती. वधू ब्युटीपार्लरमधून मंडपात येत होती. मुहूर्ताला १५ मिनिटांचा अवधी असतांना पथक तेथे पोहचले. थेट मंडपात न जाता पथकाने १०० मिटर बाहेरच थांबणे पसंत केले. त्यानंतर वधू व वराकडील मंडळींना पाचारण केले.तहसीलदार बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षाकडील मंडळींना मुलीचे वय १७ वर्ष तीन महिने असल्याचे सांगितले. सज्ञान अर्थात १८ वर्षाची मुलगी होत नाही तोपर्यंत विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले.वधू व वराकडील मंडळींनी देखील समजूतदारपणा दाखवत विवाह रद्द करण्याचे ठरविले. १८ वर्ष वयानंतरच मुलीचे लग्न करणार त्या आधी केल्यास कारवाई करावी असे सांगितले. त्यामुळे तहसीलदार थोरात व अधिकाºयांनी तंबी देवून विवाह थांबविला. या सर्व प्रकारामुळे वºहाडी मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली. काय झाले कुणाला समजत नव्हते.या प्रकारामुळे मात्र वधूच्या आईला मानसिक धक्का बसल्याने त्यांची मंडपातच तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.