शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उन्हाळी कांदा पिकाची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाली आह़े परिणामी शेतकरी संकटात सापडला असून नंदुरबारसह स्थानिक बाजारात दरांमध्ये वाढ होत नसल्याने कांदा परराज्यात रवाना होण्यास सुरूवात झाली आह़े जिल्ह्यात यंदा 1 हजार 800 हेक्टर्पयत उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती़ त्याचे उत्पादन येण्यास सुरूवात झाली असून नंदुरबार बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उन्हाळी कांदा पिकाची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाली आह़े परिणामी शेतकरी संकटात सापडला असून नंदुरबारसह स्थानिक बाजारात दरांमध्ये वाढ होत नसल्याने कांदा परराज्यात रवाना होण्यास सुरूवात झाली आह़े जिल्ह्यात यंदा 1 हजार 800 हेक्टर्पयत उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती़ त्याचे उत्पादन येण्यास सुरूवात झाली असून नंदुरबार बाजार समितीत दर दिवशी सरासरी 500 क्विंटलर्पयत कांदा आवक सुरू झाली आह़े गेल्या काही महिन्यात वेळोवेळी कांदा दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होत़े दोन महिन्यांपूर्वी 35 रूपये प्रतिकिलो या दराने विक्री होणारा कांदा गेल्या चार दिवसात 7 ते 10 रूपये प्रतिकिलो या दरांवर आला होता़ यातून एकीकडे सामान्यांमध्ये समाधान असले तरी लागवडीचा भरघोस खर्च करून बाजारात कांदा आणणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़  नंदुरबार बाजारात गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने 500 क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक कांदा आवक झाली आह़े यामुळे दरांमध्ये प्रचंड घट झाली आह़े येथे दर मिळत नसल्याने शेतकरी मध्यप्रदेशातील इंदौर किंवा मग गुजरात राज्यातील अहमदाबादसह इतर बाजारपेठांचा रस्ता धरत आहेत़ त्याठिकाणी व्यापारी कांद्याला साजेसे दर देत असल्याने शेतक:यांचा ओढा वाढत आह़े यातून येत्या महिन्यात पुन्हा कांदा टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े