शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ‘ऑक्टोबर हिट’चा जाणवतोय तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:22 IST

तापमानात वाढ : शहाद्यात तुरळक पाऊस, बुधवार व गुरुवार पावसाचा जोर वाढणार

नंदुरबार : नंदुरबारात गेल्या आठवडाभरापासून ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा जाणवत आह़े रविवारी नंदुरबारात 39 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली़ उन्हाळ्यासारखे उन्ह पडत असल्याने दुपारच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यांवर अघोषित संचारबंदीची स्थिती निर्माण झालेली आह़े  परतीच्या पावसाचे नुसते वातावरणसुध्दा तयार झाले नसल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े‘ऑक्टोबर हिट’ असल्याने नंदुरबार सध्या ‘हॉट सिटी’ ठरत आह़े दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आह़े ‘आयएमडी’ने सांगितल्यानुसार 10 ऑक्टोबरपासून तापमानात काही अंशी घट होऊन परतीच्या पावसाचा प्रभाव वाढणार आह़े तसेच ‘स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार 10 व 11 ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वातावरण राहणार आह़े तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, रविवारी नंदुरबारात तब्बल 39 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली़ त्यामुळे पावसाळ्यात उन्हाळा परतलाय की काय? अशी स्थिती निर्माण झालेली आह़े दुपारच्या वेळी तापमानात प्रचंड वाढ होऊन सोबतीला आद्रतेताही चांगलीच जाणवत आह़े त्यामुळे उन्हाळा गेल्यावर अळगळीत ठेवलेले कुलर नागरिकांकडून पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात यंदा केवळ 67 टक्के इतक्याच पजर्न्यमानाची नोंद करण्यात आली आह़े त्यातच ऑक्टोबर हिट जाणवत असल्याने पिकांची स्थिती चिंताजनक झालेली आह़े वाढत्या तापमानामुळे पिक माना टाकत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यातच पावसाचीही कृपा होत नसल्याने निसर्गाच्या दुहेरी संकटाला शेतक:यांसह सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आह़े दरवर्षी ऑक्टोबर हिटचा नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रभाव जाणवत असतो़ यंदा उन्हाळी दिवसांमध्ये नंदुरबारचे तापमान 44 ते 45 अंशार्पयत जावून पोहचले हहोत़े त्यातच आता ऑक्टोबर हिटमध्येही तापमान चाळीशी जवळ येऊन पोहचले आह़े त्यामुळे सर्वाकडूनच पावसाची आतूर्तेने वाट पाहिली जात आह़ेदरम्यान, स्कायमेट या हवामान संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार व गुरुवार नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आह़े त्याच बरोबर शनिवारी शहादा तालुक्यातील सारंगखेडा, बामखेडा, कौठल, वडाळी, कळंबू आदी परिसरात तुरळक ठिकाणी 15 ते 20 मिनीट पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ त्यामुळे येत्या काही दिवसात तापमान कमी होऊन पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पावसाच्या आगमनाने पिकांना फारसा काही फायदा होणार नसल्याचे म्हटले जात आह़े परतीचा पाऊस चांगला बरसला तर याचा फायदा जलस्त्रोतांमध्ये वाढ होण्यास नक्कीच होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े