शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

नंदुरबारातील आरोग्य सेवा कोलमडल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:08 IST

साडेनऊशे कर्मचा:यांचे कामबंद : पर्यायी व्यवस्थेबाबत प्रशासनाची उदासिनता

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका व लघुलेखक यांच्यासह तब्बल 950 कर्मचारी संपावर असल्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे. महिलांची प्रसुती, बालकांचे व गरोदर महिलांचे लसीकरण, आरोग्य तपासणी आदी सेवा ठप्प पडल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून कंत्राटी कर्मचा:यांचे कामबंद असून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण देखील सुरू आहे.राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी 11 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पुनर्रनियुक्ती प्रक्रियेत बदल करून यापुढील पुनर्रनियुक्ती फक्त सहा महिन्यांची तसेच कामावर आधारीत मार्क सिस्टिीम तयार करण्यात आली आहे. या अन्यायकारक बदलांना विरोध करण्यासाठी व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे. समायोजन होईर्पयत समान काम समान वेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच कंत्राटी कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचा शनिवारी पाचवा दिवस होता. आरोग्य सेवेवर परिणामकामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा मुख्य कणा आहे. नियमित कर्मचा:यांच्या तोडीने व बराबरीने हे कर्मचारी आरोग्य सेवा पुरवित असतात. आता सर्वच कंत्राटी कर्मचारी संपावर असल्यामुळे नियमित कर्मचा:यांवर कामाचा ताण आला आहे. काही ठिकाणी नियमित सेवेतील कर्मचा:यांऐवजी केवळ कंत्राटी कर्मचा:यांवरच आरोग्य सेवेचा गाडा चालविला जात असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिका:यांची संख्या जवळपास 60 आहे. याशिवाय औषध निर्माता, एएनएम, लघुलेखक आणि इतर कर्मचा:यांचा समावेश असल्यामुळे दैनंदिन सेवा पुरवितांना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्षपाच दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर असतांना त्यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अनेक आरोग्य केंद्र, दवाखान्यांमध्ये समस्या निर्माण झाली आहे. कर्मचारी   संपावर असल्यामुळे आरोग्य सेवेवर पडणारा ताण लक्षात घेता   प्रशासनाने तातडीने पर्यायी      व्यवस्था करणे आवश्यक असतांना त्याबाबत उदासिनता दिसून आली. आरोग्य विभागातील   प्रशासकीय कामकाज देखील विस्कळीत झाले आहे. जवळपास 70 पेक्षा अधीक लघुलेखक याअंतर्गत काम करतात. अनेकांचा पाठींबाआंदोलनाला आतार्पयत  आमदार अॅड.के.सी.पाडवी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, मॅग्मो संघटना यांच्यासह अनेक शासकीय, कंत्राटी संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.जोर्पयत मुख्य मागण्या पुर्ण होणार नाहीत तोर्पयत आंदोलन बेमुदत सुरू राहणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनार यांनी सांगितले.