शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला 30 टक्के पाणीपुरवठा करणारा स्त्रोत झाला बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला कधी नव्हे अशी यंदा पाणी टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकुण पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला कधी नव्हे अशी यंदा पाणी टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकुण पाणी पुरवठय़ापैकी 30 टक्के पाणी पुरवठा करणारा आंबेबारा प्रकल्प कोरडा झाला आहे. विरचक प्रकल्पात देखील अवघा 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे पालिकेने यापूर्वीच पाणी कपात केली असली तरी सध्या वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले आहे. शहराला विरचक प्रकल्पातून 70 टक्के तर आंबेबारा प्रकल्पातून 30 टक्के पाणी पुरवठा केला जातो. विरचकमधील सर्व पाणी पालिकेसाठी आरक्षीत असते तर आंबेबारा प्रकल्प पुर्ण 100 टक्के भरल्यास त्यातील 50 टक्के पाणी आरक्षीत केले जाते. यंदा अवघा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे आंबेबाराचा पुर्ण पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला होता. परंतु हा साठा देखील आता आटला आहे. शिवाय आष्टे पंपींग स्टेशनची विहिर देखील आटली आहे. त्यामुळे येथून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. वीरचक प्रकल्पात देखील केवळ 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. आणखी तीन ते चार आठवडय़ात केवळ मृत साठा शिल्लक राहणार आहे. जर पाऊस लांबला तर शहरवासीयांना पाणी-बाणीच्या स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. विजेची समस्येमुळे शहरातील जलकुंभांमध्ये पाणीसाठा होण्यास वेळ लागत असून  शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  गेल्या दहा दिवसांपासून ही समस्या आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. पाण्याचा अपव्यवय करणा:यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अनेक कुटूूंब अंगणात पाणी शिंपडणे, टाकी भरली तरी ती तशीच वाहू देणे, वाहने धुणे, नळांना तोटय़ा न बसविणे, घरातील बेशीन, स्वच्छतागृहात पाणी वाहू देणे असे प्रकार करतात. पाण्याचे मोल ज्यांना नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणे आवश्यक असल्याच्या सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे.