लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या नंदुरबार-दोंडाईचा या मार्गाची चाचणी 13 व 14 मे रोजी होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली.उधना-जळगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. केवळ नंदुरबार-दोंडाईचा हा 35 किलोमिटरचा टप्पा तेवढा बाकी होता. त्या टप्प्याचे काम मार्च अखेर पुर्ण करावयाचे होते. परंतु एप्रिलअखेर हे काम पुर्ण झाले. आता या रेल्वेमार्गाची चाचणी होऊन तो वापरासाठी उपयोगाता आणला जाणार आहे. त्यासाठी 13 व 14 मे रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चाचणी होणार आहे. त्यांच्या अभिप्रायानंतरच हा रेल्वेमार्ग वापरासाठी खुला होणार आहे. चाचणीमुळे सर्व तांत्रिक कामे पुर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय} सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी एकदा चाचणीची तारीख देवूनही ती होऊ शकली नव्हती.दरम्यान, या काळात रेल्वेमार्ग परिसरात कुणीही फिरू नये, रेल्वेमार्ग ओलांडू नये असे आवाहन देखील पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील किरकोळ काम पुर्ण करण्यात येत होते.
नंदुरबार-दोंडाईचा मार्गाची चाचणी रविवार व सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:12 IST