शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:12 IST

पावसाची रिपरिप सुरुच : भिजपावसाने पिके तरारली तर जलसाठे मात्र कोरडेच

नंदुरबार : गेल्या आठवडाभरापासून नंदुरबारात रिमङिाम पाऊस सुरु आह़े मंगळवारीसुध्दा पहाटेपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली होती़ पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे गेल्या आठवडय़ापासून नंदुरबारकरांना सूर्यदर्शनाची प्रतीक्षा आह़े नंदुरबारसह खान्देश व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खाते तसेच स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेतर्फे देण्यात आला आह़े गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार शहरासह, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा व धडगाव आदी ठिकाणी पावसाची रिपरिप सुरुच आह़े यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असल्याचे चित्र दिसून येत आह़े जवळपास सर्वच ठिकाणच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत़ संततधार पावसामुळे शेती पिकांना फायदा मिळत असला तरी, या पावसामुळे अद्याप कुपनलिका, विहिर, नद्या-नाले आदी जलस्त्रोत अद्याप भरलेले नाहीत़ जिल्ह्यात मुसळधार पावसाची आवश्यकता आह़े रिमङिाम पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीत काही प्रमाणात का होईना भर पडत असल्याचे सांगण्यात येत आहेत़ कष्टक:यांची उडाली दाणादाणमंगळवार नंदुरबारातील बाजाराचा दिवस असल्याने भिजपावसात आपला माल विकायला आलेले शेतकरी, कष्टक:यांची चांगलीच दाणादाण उडाली़ दिवसभर पावसाची संततधार सुरु असल्याने अनेकांनी छत्र्यांचा आधारत घेत भरपावसातच सुभाष चौक, मंगळ बाजार, तुप बाजार आदी ठिकाणी आपली दुकाने मांडली होती़ पावसामुळे बाजारावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आल़े संततधार पावसामुळे दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ कुठे ब्रेक डाऊन तर कुठे पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ पुढील तीन दिवस पावसाची रिपरिप कायम राहणारभारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस नंदुरबारसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आह़े बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे हा अतिवृष्टीचाही इशारा मध्य महाराष्ट्रात देण्यात आला आह़े पावसामुळे पिकं तग धरु लागल्याने शेतक:यांमध्येही साहजिकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आह़े दमदार पाऊस व्हावाजिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु असली तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही़ जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवणुकीसाठी चा:या तसेच खड्डे खोदण्यात आलेले आहेत़ त्यामुळे दमदार पाऊस होऊन याव्दारे जमिनीत पाण्याचे सिंचन व्हावे तसेच विविध जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े  अद्यापही कुपनलिकांना पाणी लागले नाही तर, विहिरीसुध्दा कोरडय़ा पडल्या आह़े त्यामुळे मुसळधार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव व धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याचे दिसून येत आह़े