शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्याचे पीक कर्ज उद्दिष्ट 120 कोटी वाटप अवघे 23 कोटी

By admin | Updated: June 9, 2017 12:19 IST

अवघे 19 टक्के पीक कर्ज वाटप : नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 11 कोटी

संतोष सूर्यवंशी /ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.9 - धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत खरिप हंगामासाठी आतार्पयत केवळ 23 कोटी 12 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल़े यंदाच्या हंगामात नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 120 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आह़े पैकी, केवळ 19 टक्केच कर्जाचे वाटप आतार्पयत झाले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
यंदा नंदुरबार जिल्ह्यात कर्जाचे वाटप करण्यासाठी बँकेला 120 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले  होत़े त्यापैकी 23 कोटी 12 लाख 21 हजार रुपयांचे 3 हजार 489 शेतकरी सभासदांना वाटण्यात आले आह़े  दरम्यान, मागील हंगामात 19 हजार 944 सभासदांना 99 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होत़े त्यापैकी 5 हजार 447 सभासदांनी 31 कोटी 23 लाख रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती चौधरी यांनी दिली़ त्यामुळे अजूनही 14 हजार 498 सभासदांचे 68 कोटी 6 लाख रुपये थकीत आह़े त्यामुळे मागील वसूल करण्यात आलेल्या रकमेतून यंदाच्या हंगामासाठी 23 कोटी 12 लाख रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आह़े त्यामुळे आता उर्वरित कर्जास पात्र ठरत असलेल्या 1 हजार 957 सभासदांनाच आता 10 कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, 30 जुनर्पयत जी सभासद उर्वरित कर्ज भरतील तेच पुढील कर्जास पात्र ठरणार असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, गेली अनेक वर्षे शेतकरी एप्रिल-मे महिन्यार्पयत 50 टक्के कजर्चा भरणा करीत होती़ परंतु  आता राज्यभर सुरु असलेल्या शेतक:यांच्या कजर्माफीच्या विषयामुळे शेतकरी कर्ज भरण्यास सरसावत नसल्याचेच यातून दिसून येत आह़े दरम्यान यंदाच्या हंगामात तालुकानिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतल्यास, नंदुरबार तालुका 10 कोटी 91 लाख 77 हजार, शहादा व धडगाव मिळून 8 कोटी 13 लाख 31 हजार, तळोदा तालुका 1 कोटी 97 लाख 68 हजार, अक्कलकुवा तालुका 24 लाख 48 हजार तर नवापूर तालुक्यात 1 कोटी 84 लाख 97 हजार रुपयांचे कर्ज वाटप आतार्पयत करण्यात आले आह़े