शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नंदुरबार जिल्ह्यात इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: May 22, 2018 12:53 IST

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम : आठवडाभरात सातत्याने चढउतार

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे संपूर्ण देशात कमी-अधिक प्रमाणात पेट्रोल, डिङोलच्या किमतीत वाढ झाली आह़े परंतु नंदुरबारातील नागरिकांना इंधनवाढीचा सर्वाधिक चटका सहन करावा लागतो़ राज्याचा विचार करताना नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल व डिङोलचे दर सर्वाधिक असल्याची माहिती आह़े खनिज इंधन उत्पादन करणा:या अरेबियन देशांनी आपल्या कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ केल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनीसुद्धा पेट्रोल व डिङोलच्या दरात मोठी वाढ केली आह़ेदेशात सर्वत्र इंधनाचे दर गगनाला भिडले असले तरी याचा सर्वाधिक फटका नंदुरबारकरांना बसत आह़े सोमवारी नंदुरबारात पेट्रोलचे दर 85 रुपये 52 पैसे तर डिङोलचे                   दर 73 रुपये 35 पैसे नोंदविण्यात आले आह़े त्यामुळे राज्यात किंबहुना देशातसुद्धा नंदुरबार जिल्ह्यात इंधनाचे दर सर्वाधिक असल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला आह़े नंदुरबारातील देसाई पेट्रोलपंपावर पेट्रोल 85 रुपये 52 पैसे तर डिङोल 73 रुपये 36 पैसे, पी़जी़ पेट्रोल पंप धुळे रोड येथे पेट्रोल 85 रुपये 48 पैसे तर डिङोल 73 रुपये 31 पैसे तर, भाऊ पेट्रोल पंपावर पेट्रोल 85 रुपये 52 पैसे तर डिङोल 73 रुपये 35 पैसे नोंदविण्यात आले आह़े जळगाव व धुळे जिल्ह्यातसुद्धा साधारणत: पेट्रोल 85 रुपये 34 पैसे तर डिङोल 72 रुपये 3 पैसे इतके नोंदविण्यात आले आह़े खान्देशचा विचार करता, नंदुरबारात इंधनाच्या दराचा सर्वाधिक भडका उडाला असल्याची स्थिती निर्माण झाली आह़े सेसमुळे वाढत्या दराचा फटकाउड्डानपुलावर सेस लावला जात असल्याने नंदुरबारात साधारणत: रुपया-दीड रुपयाने पेट्रोल व डिङोलच्या किमतीत वाढ होत आह़े 1 जून 2012 रोजी येथील उड्डानपुलाच्या निर्मितीपासून सेस लावण्यात आला होता़ सुरुवातीला चार वर्ष म्हणजे 31 डिसेंबर 2017 र्पयत लावण्यात येणा:या सेसची मुदत पुन्हा दोन वर्षानी वाढवण्यात आली आह़े तसेच व्हॅटच्या दरातही दोन टक्क्यांनी वाढ झाल्याने याचा बोजा सर्वसामान्य नंदुरबारकरांना उचलावा लागत असल्याचे दिसून येत आह़े पेट्रोल-डिङोलच्या वाढत्या दरांमुळे साहजिकच याचा फटका खासगी आराम बस तसेच एसटी बसेसच्या भाडय़ात जाणवू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही़ ऑईल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार सोमवारी नवीन इंधन दरवाढ केली़ आठवडाभरात इंधन दरवाढीत वेगवान हालचाली घडत होत्या़ नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा दोन दिवसात तब्बल दीड रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली़ दरम्यान, कच्च्या तेलाचे उत्पादन करणा:या कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली असल्याने परिणामी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनादेखील पेट्रोल-डिङोलच्या दरात वाढ करण्यात आली आह़े परंतु येत्या आठवडय़ात इंधनाचे दर पुन्हा कमी होतील, असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होत                  आह़े सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलच्या दराचा सर्वाधिक फटका बसत असतो़ दरवाढीमुळे अनेकांचे आर्थिक बजेटसुद्धा कोलमडत असत़े वाढत्या इंधन दरवाढीमुळे साहजिकच दळणवळण व्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असतो़ डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने याचाही परिणाम इंधन दरवाढीवर जाणवत असतो़ त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर बलाढय़ देशांची आर्थिक गणिते एकमेकांमध्ये गुंतलेली असतात़़ त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मोठा परिणाम इंधन दरवाढीवर जाणवत असतो़