शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार ३७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती गंभीर राहण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या केवळ १० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती गंभीर राहण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्के निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्याअनुषंगाने पहिल्या तिमाहीसाठी नंदुरबार जिल्ह्याला ३७ कोटींचा निधी महसुली व भांडवली खर्चासाठी मिळणार आहे.राज्यात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीकरिता अनिवार्य व कार्यक्रम खर्चाच्या एकूण अर्थसंकल्पीत तरतुदीच्या १५ ते २५ टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी सर्व जिल्ह्याच्या मंजूर आकारमानाच्या केवळ १० टक्के निधी महसुली व भांडवली लेखा शिर्षकांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याला ३७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतुदीपैकी एकूण २५ टक्केपर्यंतचा निधी हा सार्वजनिक आरोग्य विभाग तथा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्यविषयक सुविधांसाठी खर्च करण्याची सक्ती शासनाने केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधा बळकट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्याची आर्थिक स्थिती यावर्षी गंभीर राहणार असल्याने खर्च करताना काटकसरीच्या सूचनाही शासनाने सर्व जिल्ह्यांना जारी केल्या आहेत.