शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जि.प.निवडणुकीत उमेदवार उभे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 10:42 IST

राष्ट्रीय समाज पक्ष मेळावा : महादेव जानकर यांचे प्रतिपादन

नंदुरबार : राष्ट्रीय समाजपक्षातर्फे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आतापासूनच कार्यकत्र्यानी बुथ पातळीवर प्रमुखांची नेमणूक करण्याच्या सुचना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यमंत्री महादेव जानकर यांनी दिल्या.बुधवारी नंदुरबारात रासपचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढाकणे पाटील, प्रदीप सोनार, सुरेखा वाघ, राजाभाऊ पोथारे, बाळासाहेब दोडतले, सुभाष राजपूत, पुष्पाबाई थोरात, सुनीता वसावे, राहुल कुकरेजा आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील पक्ष पदाधिका:यांशी चर्चा केली व पक्ष कार्याचा आढावा घेतला. जानकर यांनी येत्या काळात होणा:या सर्वच निवडणुकांमध्ये पक्ष उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जिल्हा, तालुका कार्यकारिणी गठीत करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. महिला आघाडी देखील अधीक सक्षम करण्यासाठी प्रय} करावा. अपंग, युवक, उद्योग आघाडींमध्ये त्या त्या क्षेत्रातील लोकांना जोडावे. सर्वात आधी बुथनिहाय प्रमुख नेमण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. निवडून येऊ शकतील अशा ठिकाणीच उमेदवार देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.