संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्याथ्र्याची बँक खाती उघडण्यात नंदुरबार जिल्हा राज्यात अव्वल आला आह़े आतार्पयत नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे तब्बल 84 हजार विद्याथ्र्याची बँकखाती उघडण्यात आली आह़े मुंबई येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयात ही बैठक घेण्यात आली़ यात मोफत गणवेश योजनेसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेण्यात आला़ त्यात, नंदुरबारसह लातूर, सिंदुदुर्ग, परभणी या जिल्ह्यांनी योजना चांगल्या प्रकारे राबविल्याचे सांगण्यात आल़े बैठकीत उपसंचालक विक्रमसिंह यादव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महावीर माने हे उपस्थित होत़े तसेच जिल्ह्यातील बँक खात्यांच्या स्थितीबाबत प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी मनिषा पवार यांनी कामकाजाची माहिती दिली़ गणवेशाच्या निधीसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका शाळेतील लाभार्थी विद्याथ्र्याना बँकेत खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले आह़े परंतु बहुतेक बँका ङिारो बॅलेन्सवर खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करीत असतात़ त्यामुळे विद्याथ्र्याचे बँक खाते उघडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात़ याबाबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली़ सध्या नंदुरबार जिल्ह्यातील गणवेशासाठी लाभार्थी विद्याथ्र्याची संख्या ही 1 लाख 1 हजार 619 इतकी आहे त्यापैकी सुमारे 84 हजार विद्याथ्र्याचे बँक खाते उघडण्यात आली आह़े नंदुरबार सारख्या भागात मुळात बँक शाखा कमी आहेत़ त्यामुळे येथे विद्याथ्र्याच्या बँक खाती उघण्यास अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आह़े तरीदेखील राज्यात लातूर, सिंदुदुर्ग, परभणी व नंदुरबार हे चार जिल्हे विद्याथ्र्याची बँक खाती उघण्यात अव्वल असल्याचे बैठकीत सांगण्यात आल़े दरम्यान, शिक्षण विभागाकडून शिक्षण उपसंचालकांसमोर अनेक अडचणी मांडण्यात आल्या़ यात बँक खाते उघडण्यास बँकेकडून घेण्यात येणारी आडमुठी भूमिका, पालकांमधील निरुत्साह आदींचा समावेश आह़े
गणवेशासाठी बँक खाती उघडण्यात नंदुरबार जिल्हा अव्वल
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 2, 2017 12:03 IST
मुंबई येथे बैठक : 84 हजार विद्याथ्र्याची बँक खाती
गणवेशासाठी बँक खाती उघडण्यात नंदुरबार जिल्हा अव्वल
ठळक मुद्दे उर्वरीत विद्याथ्र्याची बँक खातेही लवकरच एकूण 1 लाख 1 हजार 619 विद्यार्थी मोफत गणवेश लाभासाठी पात्र आहेत़ त्यापैकी सुमारे 84 हजार विद्याथ्र्याचे बँक खाती ङिारो बॅलेन्सवर उघडण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाला यश आले आह़े लवकरच उर्वरीत विद्याथ्र्याचेही बँक