शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:16 IST

आरटीई : जिल्ह्याभरातून ४७० जागांसाठी केवळ १८३ आॅनलाईन प्रवेश अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत (आरटीई) पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातून १८३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात ३५३ आरटीई जागांसाठी केवळ १०६ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यात नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’ आहे़ विशेष म्हणजे पालघर, गडचिरोली, यवतमाळ सारखे आदिवासी बहुल जिल्हे नंदुरबारपेक्षा आघाडीवर आहेत़यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत पालकांकडून उत्साह दाखवला जात असला तरी आरटीईअंतर्गत शंभर टक्के प्रवेश होईल अशी खात्री नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ राज्यात सिंधुदूर्ग व नंदुरबार जिल्हे आरटीई प्रथम प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे अहवालातून उघड झालेले आहे़दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७८४ जागांसाठी ३२४ अर्ज, पालघर ४ हजार २५२ जागांसाठी ५७१ अर्ज, यवतमाळ १ हजार ७४४ जागांसाठी तब्बल २ हजार ६५१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे जिल्हे काही प्रमाणात मागे आहेत़पुणे जिल्हा हा आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रि येत आघाडीवर असून पुणे जिल्ह्यात एकूण ९६३ शाळा प्रवेशास पात्र आहेत़ तर १६ हजार ६१९ विद्यार्थी कोट्यासाठी तब्बल ३० हजार ३६४ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत प्रवेश प्रकिया राबवली जात आहे़ ५ हजार ७६४ जागांसाठी ७ हजार १४३ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ जळगावात २७४ शाळामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे़ यात, ३ हजार ७१७ जागांसाठी ३ हजार ४१८ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत़ तर धुळ्यात ९७ शाळांतर्फे सुुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेत १ हजार २३७ जागांसाठी ९८० प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात नंदुरबार जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़दरम्यान, नंदुरबारचा विचार करता यंदा आरटीईच्या पूर्वीच्या ४७९ विद्यार्थ्यांच्या कोट्यामध्ये नऊने घट होऊन यंदा ४७० जागाचा कोटा ठेवण्यात आला आहे़ तर पात्र शाळांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ पूर्वी आरटीई प्रवेश पात्र ४३ शाळा होत्या़ त्यांची संख्या आता ४७ इतकी झाली आहे़ गेल्या वर्षी आरटीईअंतर्गत ४७९ पैकी केवळ १३७ जागाच भरल्या गेल्या होत्या़ तर उर्वरीत जागा पाच वेळा प्रवेश प्रक्रिया राबवूनही भरता आल्या नव्हत्या़ तसेच आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील एकूण ४३ शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत़ परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याचा शाळांना पालकांची पसंती असते़उर्वरीत शाळांमध्ये आरटीईअंतर्गत देण्यात आलेला विद्यार्थी कोटा हा शंभर टक्के रिक्त राहत असल्याची स्थिती आहे़ त्यामुळे शासनाने यंदा जिल्ह्यातील आरटीई कोटा केवळ ९ जागांनी घटवला तर दुसरीकडे शाळा ४३ वरुन ४७ वर आणल्या असल्याने शिक्षण विभागाच्या अजब निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत़