शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात 41 हजार मतदारांचे यादीत छायाचित्रच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदारांना आता रंगीत छायाचित्रासह रंगीत मतदार कार्ड दिले जाणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 41 हजार मतदारांचे फोटो नसल्यामुळे त्यांचे कार्ड बनविणे बाकी आहे तर दोन हजार 480 मतदारांचे फोटो हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्यामुळे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र घेतले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 20 जूनर्पयत मतदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदारांना आता रंगीत छायाचित्रासह रंगीत मतदार कार्ड दिले जाणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 41 हजार मतदारांचे फोटो नसल्यामुळे त्यांचे कार्ड बनविणे बाकी आहे तर दोन हजार 480 मतदारांचे फोटो हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्यामुळे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र घेतले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 20 जूनर्पयत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देणार असून मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. येत्या जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमिवर जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. त्याअंतर्गत आता प्रत्येक मतदाराला आकर्षक रंगीत मतदार कार्ड दिले जाणार आहे. त्यानुसार किती मतदारांचे कार्ड नाही, किती जणांकडे ब्लॅक अॅण्ड व्हाईट मतदार कार्ड आहे याची माहिती काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास 45 हजार मतदारांकडे मतदार कार्ड नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील 41 हजार मतदारांचे मतदार यादीत फोटोच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.फोटो मिळविणारमतदार यादीत फोटो नसलेल्या 41 हजार मतदारांचे फोटो मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येणार असून बीएलओदेखील घरोघरी जाऊन मतदार फोटो जमा करणार आहेत.याशिवाय जिल्ह्यातील दोन हजार 480 मतदारांचे फोटो हे ब्लॅक अॅण्ड व्हॉईट स्वरूपातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे त्याच प्रकारचे मतदार कार्ड आहे. अशा मतदारांकडूनदेखील रंगीत फोटो मिळविण्यासाठी प्रय} सुरू आहेत. यापैकी 23 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. आतार्पयत 706 मतदारांकडून रंगीत फोटो मिळविण्यात आले आहेत. मतदार केंद्र अधिकारी  आता घरोघरी जाणारलोकसभा व इतर निवडणुकांच्या पाश्र्वभूमिवर मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे यांनी सांगितले, मतदार याद्या अद्ययावतीकरणानुसार 20 जून र्पयत जिल्ह्यात मतदार केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेटी देणार आहेत. 1 जोनवारी 2019  या अर्हता दिनांकावर आधारित  मतदारांची माहिती घेऊन यादी करण्यात येणार आहे. त्याच दिनांकाच्या आधारावर 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांचे फॉर्म नमुना सहा भरून मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. याशिवाय मतदार यादीतील नोंदीची पडताळणीदेखील करण्यात येणार आहे. नाव व नोंदीतील दुरुस्ती, मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित यांची नावे वगळण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्राप्त होणारे अर्ज हे इरोनेट द्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकारी व साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त होणारे दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे.सर्वानाच प्रशिक्षणया कामासाठी नेमलेल्या सर्वच कर्मचा:यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याअंतर्गतच ते कार्यवाही करणार आहेत. संबंधितांना साहित्याचेदेखील वाटप करण्यात आले असून त्याद्वारे सुरुवातही करण्यात आली आहे.