शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नंदुरबार जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंब झालीत चूलमुक्त

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: June 5, 2018 13:08 IST

वृक्षतोडीस आळा : जंगलातील गावांमध्ये सिलिंडरचे वाटप

ठळक मुद्देवनक्षेत्रातील जंगलतोड होण्यास आळा बसलापहिल्या वर्षाला 8 सिलिंडर तर दुस:या वर्षापासून 6 सिलिंडर जंगलालगतच्या गावांमध्येही मोफत गॅस सिलिंडरचे वाटप

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : वनविभागातर्फे गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील 3 हजार 430 कुटुंबीयांना एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आह़े त्यामुळे ही कुटुंबे आता पूर्णपणे चूलमुक्त होऊन वनक्षेत्रातील जंगलतोड होण्यास आळा बसला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आह़ेदुर्गम भागात वाढत चाललेली वृक्षतोड, त्यामुळे होणारा पर्यावरणीय :हास, जंगलतोडीमुळे वाढते तापमान आदींपासून बचाव करण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी जंगलातील गावांमध्ये गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येत असत़े गेल्या दोन वर्षामध्ये वनविभागाकडून अशा गावांमध्ये 3 हजार 430 लाभाथ्र्याना एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आह़े त्यापैकी, नवापूर व नंदुरबार तालुक्यात 2 हजार 509 गॅस सिलिंडर तर शहादा विभागांतर्गत येणा:या शहादा, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव या तालुक्यांमध्ये 921 एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आह़े नंदुरबारातील दुर्गम भागात बहुतेक कुटुंबीय सरपणासाठी वृक्षतोड करीत असतात़ साहजिकच त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत आह़े वृक्षतोडीमुळे वनक्षेत्रामध्येही सातत्याने घट होत आह़े जिल्ह्यात एकूण 2 लाख 8 हजार हेक्टर जमीन वनक्षेत्राखाली आह़े परंतु गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास वनक्षेत्राखालील जमीन दिवसेंदिवस कमी होत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे जंगलतोड कमी व्हावी, दुर्गम भागातील ग्रामस्थांना सरपणाला पर्याय मिळावा म्हणून वनविभागाकडून एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येत असत़े गॅस सिलिंडरवर वनविभागाकडून 75 टक्के अनुदान देण्यात येत असत़े तर 25 टक्के रक्कम स्वत: लाभाथ्र्याना भरावी लागत असत़े समित्यांचे केलेय गठणलाभाथ्र्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून प्रत्येक तालुक्यात समित्या गठित करण्यात येत असतात़ त्या समित्यांच्या सदस्यांकडून दुर्गम भागात जाऊन जंगल परिसरातील गावांना भेटी देत लाभाथ्र्याचा शोध घेऊन त्यांची नोंद करण्यात येत असत़े त्यानंतर लाभाथ्र्याकडून त्यांचे आधार कार्ड, बँक खातेक्रमांक घेण्यात येत असतो़ संबंधित लाभाथ्र्याला कुठल्या दुस:या योजनेतून एलपीजी गॅस सिलिंडरचा मिळतोय काय? याची खातरजमा प्रकल्प विभागाकडून प्रमाणित करण्याचे काम वनविभागाकडून करण्यात येत असत़े  लाभाथ्र्याना एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यासाठी वनविभागाकडून 75 टक्के अनुदान देण्यात येत असत़े त्याच सोबत जिल्हा नियोजन समितीकडूनही यासाठी निधीची तरतूद करण्यात येत असत़ेलाभाथ्र्याना सिलिंडरनुसार 2 शेगडय़ा, रेग्युलेटर आदी विविध गरजेची साहित्येसुध्दा वाटप करण्यात येत असतात़ प्रथम गॅस सिलिंडरची जोडणी करणा:या लाभाथ्र्याना पहिल्या वर्षाला 8 सिलिंडर तर दुस:या वर्षापासून 6 सिलिंडर देण्यात येत असतात़ त्यासोबतच पाणलोट विकास कार्यक्रमातूनसुध्दा त्यांना  किराणा दुकानासारखे व्यवसाय थाटून रोजगार निर्मिती उपलब्ध करून देण्यात येत़े या सर्वातून जंगलतोडीवर ब:यापैकी अंकुश बसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आल़ेवनविभागाकडून श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेव्दारे गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येत आह़े परंतु अजून बहुतेक दुर्गम भागात योजना पोहचण्याची बाकी आह़े त्यामुळे मोठय़ा प्रमाणात होत असलेली जंगलतोड व पर्यायाने पर्यावरणाचा होणारा :हास हे रोखण्यासाठी अधिकाधिक गावांमध्ये योजना पोहचने अपेक्षीत आह़ेसुरुवातीला केवळ जंगलातील गावांमधील ग्रामस्थांनाच योजनेचा लाभ देण्यात येत होता़ परंतु आता जंगलालगतच्या गावांमध्येही मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येत आह़े जास्तीत जास्त गावांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर व्हावा, अशी अपेक्षा आह़े