शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात अडीच लाख टन चा:याची कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता आणखी वाढणार आहे. जिल्ह्याला लागणा:या एकुण चा:यापैकी सद्य स्थितीत दोन लाख 65 हजार मे.टन चा:याची कमतरता आहे. दरम्यान, अनेक गावांमधून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे येवू लागली असली तरी प्रशासन अद्याप त्याबाबत गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.      गेल्या वर्षी अपेक्षीत पजर्न्यमान झाले नाही. सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाला. तो देखील अनियमित होता. त्यामुळे खरीप पीक जेमतेमच आले.  पाऊसच कमी असल्यामुळे धरणे, नदी, नाले, बंधारे कोरडे राहिले. परिणामी रब्बी पीक देखील घेता आले नाही. त्याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला. ही  बाब लक्षात घेता गेल्या महिन्यापासून जनावरांच्या चा:याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागातील शेतक:यांनी चारा, पाण्याअभावी आपली गुरं विकून टाकली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली चारा छावणीची मागणी प्रशासनाने पुर्ण केली असती तर आज अनेक शेतक:यांची गुरं विक्री झाली नसती.परजिल्ह्यात बंदीचारा टंचाईची स्थिती उद्भवणार ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यातच परराज्य आणि इतर जिल्ह्यात चारा विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. तसा अद्यादेशही काढलेला आहे. असे असतांना बराच चारा परजिल्ह्यात विक्री झाला आहे. त्यासाठी संबधीतांनी विविध माध्यमाचाही वापर केला आहे. चारा उत्पादन अभियानकृषी विभागाच्या चारा उत्पादन अभियानाचाही फारसा उपयोग झालेला नाही. शेतक:यांना सिंचनासाठी पाणीच नसल्यामुळे चारा लागवड करणार तरी कशी हा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता यंदा कृषी विभागाच्या या योजनेलाही अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याची स्थिती आहे. परिस्थिती बिकटपिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा संदर्भातील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील काही भाग तसेच नवापूर तालुक्यातील पूर्व भागात ही स्थिती गंभीर आहे. अनेकांनी आपली गुरे पोषणासाठी इतर ठिकाणी पाठवून दिली आहेत. तापी काठावर छावण्या..तापी काठावर अर्थात प्रकाशा ते सारंगखेडा या दरम्यान तापीला पाणी आहे. या दोन्ही ठिकाणी बॅरेज असल्यामुळे पाणी अडविले गेले आहे. त्यामुळे तापी काठावर चारा छावण्या उभारल्यास जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार होता तसेच चारा वाहतुकीलाही सोयीचे ठरणार होते. त्यानुसार सव्र्हे देखील करण्यात आला. परंतु छावणी उभारण्यासारखी परिस्थिती नसल्याचे चित्र प्रशासनानेच निर्माण केल्याने हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने चारा छावण्यांना खो बसणार आहे.