नंदुरबार : नंदुरबार-धडगाव मार्गावर धावणाऱ्या मिनी बसेसची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झोलेली आहे़ वेळोवेळी देखभाल दुरुस्ती न करताच बसेस धावत असल्याने दुरुस्तीच्या खर्चातही वाढ होत आहे़तळोदा मार्गे नंदुरबार-धडगाव मिनी बसफेºया सुरु आहेत़ सुरुवातीला ४ बसेस्व्दारे या बसफेºया होत होत्या़ परंतु नादुरुस्तीमुळे २ बसेस् आगारात पडून असून केवळ दोन बसव्दारेच फेºया सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ दरम्यान, या मिनी बसेस्ची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली असल्याचे दिसून येत आहे़ खुद्द चालकांचीच आसन व्यवस्था मोडकडीस असल्याने तेथे प्रवाशांच्या आसनाची परवा कुणाला अशी चर्चा प्रवाशांमध्ये रंगत आहे़ बसच्या खिडक्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे़ बसेसची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असताना त्यांना तशाच अवस्थेत चालविण्यात येते. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत असून उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे़
नंदुरबार-धडगाव मिनी बसची दुरवस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 20:56 IST