शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ई-नाम प्रणालीत नंदुरबार बाजार समिती अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:49 IST

नंदुरबार : आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम प्रणालीत उत्त्कृष्ट कामकाज केल्याने नंदुरबार बाजार समितीचा सहकार व पणन विभागातर्फे ...

नंदुरबार : आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम प्रणालीत उत्त्कृष्ट कामकाज केल्याने नंदुरबार बाजार समितीचा सहकार व पणन विभागातर्फे गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पाच बाजार समितींची निवड करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हावे, मध्यस्थी व दलालांचा थेट-खरेदी विक्रीत सहभाग राहू नये यासाठी शासनाने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजना २०१६ पासून लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये साडेनऊ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल ४० लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव देखील करण्यात आला आहे. या योजनेत मध्यस्थांशिवाय थेट शेतकºयांच्या बॅँक खात्यात एक हजार १०० कोटी रुपये जमा झाले आहेत.नंदुरबार बाजार समितीने देखील गेल्या दोन वर्षांपासून ई-नाम प्रणाली सुरू केली आहे. याद्वारे शेतीमालाचा लिलाव सुटसुटीत आणि प्रभावी झाला आहे. परिणामी शेतकºयांना योग्य मोबदला देखील मिळत आहे. राज्यातील अशा प्रकारची योजना राबविणाºया बाजार समितींमध्ये नंदुरबार बाजार समितीने उत्कृष्ट काम केल आहे. त्याची दखल घेवून नंदुरबार बाजार समितीची निवड करण्यात आली आहे.प्रथम क्रमांक परभणी, द्वितीय दौंड, तृतीय कोल्हापूर तर उत्तेजनार्थ वर्धा आणि नंदुरबार बाजार समितींचा समावेश आहे. पहिल्या चार बाजार समित्या मोठ्या आणि प्रगत शहरातील आहेत तर आदिवासी भागातील केवळ नंदुरबार बाजार समिती आहे.२३ रोजी पुणे येथे एका कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या बाजार समितींना गौरविण्यात येणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती देवमन पवार, उपसभापती हरिश्चंद्र पाटील, सचिव योगेश अमृतकर व सर्व संचालक मंडळांनी यासाठी प्रयत्न केले.