शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या बाबा गणपतीला आता 11 लाखांचा नवीन रथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 20:02 IST

नंदुरबार : सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील बाबा गणपतीचा यंदा नवीन रथ राहणार आहे. खास कर्नाटकहून 11 लाख रुपये खर्च करून हा रथ तयार करण्यात आला आहे. रथ नंदुरबारात दाखल झाला असून त्यात अनेक नवीन अत्याधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.नंदुरबारात दादा व बाबा हे दोन मानाचे गणपती आहेत. गणेश ...

नंदुरबार : सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील बाबा गणपतीचा यंदा नवीन रथ राहणार आहे. खास कर्नाटकहून 11 लाख रुपये खर्च करून हा रथ तयार करण्यात आला आहे. रथ नंदुरबारात दाखल झाला असून त्यात अनेक नवीन अत्याधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.नंदुरबारात दादा व बाबा हे दोन मानाचे गणपती आहेत. गणेश विसजर्न मिरवणुकीत या दोन्ही गणपतींना अग्रभागी राहण्याचा मान असतो. गणेशोत्सवासह वर्षभर या दोन्ही गणपतींच्या ठिकाणी नवस करण्यासाठी व दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी असते. त्यापैकी जळका बाजारातील बाबा गणपतीला देखील दादा गणपतीप्रमाणेच सव्वाशे वर्षापेक्षा अधीक वर्षाची परंपरा आहे. या गणपतीचा रथालाही तेवढीच वर्ष झाल्यामुळे रथ जिर्ण झाला होता. गेल्यावर्षी त्याचा एक भाग निखळला होता. त्यामुळे मंडळाने व भाविकांनी रथ नव्याने तयार करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार निधीही गोळा तयार केला होता.  नवीन प्रकारचा आणि आकर्षक रथ कुठे आणि कसा मिळेल यासाठी मंडळाच्या पदाधिका:यांनी ठिकठिकाणी माहिती घेतली. कर्नाटकातील सिरसी येथे अशा प्रकारचे रथ तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे मंडळाचे पदाधिकारी पोहचले. तेथे रथाची सर्व प्रकारची माहिती घेतल्यानंतर त्यांनाच रथ बनविण्याची ऑर्डर देण्यात आली.फोल्डींग करता येणाराया नवीन रथाला फोल्डींगही करता येणार आहे. जागा नसल्यावर संपुर्णपणे खोलून हा रथ ठेवता येणार आहे. या रथाचे चाके 30 अंशात फिरणारे आहेत. त्यामुळे जागेवरूनच रथाची दिशा देखील बदलता येणार आहे. त्यासाठी चाकांची विशिष्ट प्रकारे रचना करण्यात आली आहे. यामुळे रथ ओढण्यासाठी लागणारी शक्ती कमी होणार आहे.आकर्षक सजावटरथाची आकर्षक सजावट आहे. रथावर अष्टविनायक कोरण्यात आलेले आहेत. याशिवाय हनुमानाची मूर्ती, शंख, चक्र, गदा, ओम कोरण्यात आलेले आहेत. याशिवाय चार सिंह व चार हत्ती देखील आहेत. कर्नाटकी शैलीची झलक या नवीन रथावर दिसून   येते.सभासदांकडूनच निधीमंडळाच्या सभासदांकडूनच वर्गणी गोळा करण्यात आली आहे. सर्वच सदस्यांनी सढळ हाताने वर्गणी दिल्याने नवीन रथ घेता आल्याचे पदाधिका:यांनी सांगितले. बाहेरील कुणाकडूनही एक रुपयाही वर्गणी घेतली नसल्याचे मंडळाचे  पदाधिकारी सुनील सोनार यांनी सांगितले.रथ पहाण्यासाठी गर्दीबाबा गणपतीचा नवीन रथ पहाण्यासाठी गेल्या दोन   दिवसांपासून भाविकांनी एकच गर्दी केली आहे. रथ जोडणीचे काम रविवारी दुपारी पुर्ण झाले. त्यासाठी कर्नाटकहून खास कारागिर येथे आले होते.