शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

नंदुरबार कृषी विभागाकडे कांदा चाळसाठी प्रस्ताव येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:23 IST

60 शेतक:यांचे जिल्ह्यातून प्रस्ताव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : मार्च महिना संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कृषी विभाग कांदाचाळ लाभार्थीच्या प्रतिक्षेत आह़े निम्मे अनुदानावर वाटप होणा:या कांदा चाळ योजनेत शेतकरी सहभागीच होत नसल्याने यंदा कृषी विभागाची उद्दीष्टय़पूर्ती होणे, शक्यच नसल्याचे स्पष्ट झाले आह़े  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा उत्पादन घेणा:या शेतक:यांना 25 मेट्रिक टनार्पयत कांदा साठवण्यासाठी लागणारी शेड (चाळ) तयार करण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येत़े गेल्या पाच वर्षात योजनेत आमुलाग्र बदल होऊन अनुदान 50 टक्क्यांवर आले आह़े आधी शेतक:यांनी खर्च करावा त्याचे पुरावे कृषी विभागाला द्यावे, मगच अनुदान मिळणार अशी पद्धत लागू झाल्याने शेतकरी या योजनेपासून दूर जात असल्याचे दिसून येत आह़े यामुळे कृषी विभागाला लाभार्थीचा शोध घेण्याची वेळ येऊन ठेपली आह़े एकूण 1 लाख 75 हजार रूपये एका कांदा चाळसाठी खर्च मंजूर करणारे शासन शेतक:यांना 87 हजार 500 रूपयांची सूट देत़े शेतक:यांनी 87 हजार 500 रूपयांचा खर्च करून अर्धी शेड उभारल्यानंतर कृषी विभाग उर्वरित रक्कम मंजूर करत असल्याने यंदा शेतक:यांनी कांदाचाळ बांधण्याला फाटा दिल्याचे दिसून येत आह़े जिल्ह्यात 200 कांदा चाळ निर्र्मितीची उद्दीष्टय़ कृषी विभागाला देण्यात आले होत़े यात अनुसुचित जाती व जमातीच्या शेतक:यांचा सहभाग वाढवण्याची ताकीदही शासनाने दिली होती़ यात शहादा, नंदुरबार, नवापूर या तीन तालुक्यातून केवळ 60 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत़ तसेच धडगाव तालुक्यातून 12 प्रस्ताव येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात कांदा उत्पादन गेल्या काही वर्षात कमालीचे खालावले आह़े पाच वर्षापूर्वी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात साधारण दोन हजार हेक्टर कांदा उत्पादन घेतले जात़े प्रामुख्याने नंदुरबार, शहादा आणि नवापूर तसेच धडगाव तालुक्यातही काही प्रमाणात हे उत्पादन घेतले जात असल्याने त्याठिकाणी कांदा चाळची गरज भासत़े 2017-18 या आर्थिक वर्षात योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थीची जादा तपासणी न करता कृषी विभागाने त्यांना थेट अनुदान दिले आह़े यातून 60 ठिकाणी कांदा चाळ तयार झाल्या आहेत़ आधी पाण्याची समस्या असल्याने कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला आह़े त्यात क्षेत्र घटल्याने कांदा उत्पादक इतर खर्चिक बाबी टाळत आहेत़ यातही बहुतांश शेतक:यांना या चाळ शेतात उभाराव्या लागत आहेत़ यासाठी लागणारे कुशल कारगीर न मिळणे, लोखंडाची वेल्डींग करण्यासाठी वीजेची प्रतिक्षा, शेतांमध्ये होणारी साहित्यांची चोरी यामुळे शेतकरी कांदा चाळ उभारण्याबाबत निरूत्साही असल्याचे चित्र आह़े  नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील आसाणे, घोटाणे, रनाळे, शनिमांडळ यासह विविध गावांमध्ये यंदा 600 हेक्टर्पयत कांदा उत्पादन घेतले जात आह़े यासोबत शहादा व नवापूर तालुक्यात कांदा उत्पादन घेतले जात आह़े याठिकाणी कांदा चाळी देण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व सहायक शेतक:यांसोबत संपर्क करून योजनांची माहिती देत आहेत़ यामुळे येत्या 31 मार्चपूर्वी 100 च्या जवळपास कांदा चाळींचा निधी मार्गी लागणार आह़े कृषी विभागाला कांदा चाळ साठी देण्यात आलेला निधी एप्रिलमध्येही वापरता येणे शक्य असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे विभागातील अधिकारी व कर्मचारी निर्धास्त आहेत़