लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या 4 हजार 761 भाविकांनी नंदुरबार आगाराच्या विशेष बससेवेचा लाभ घेतला़ नंदुरबार ते पंढरपूर असा 467 किलोमीटरच्या या प्रवासाला 22 बसेस देण्यात आल्या होत्या़ आषाढीनिमित्त राज्याच्या विविध भागातून पंढरपूरकडे निघणा:या वारक:यांच्या सोयीसाठी यंदाही विशेष बसेसची सोय राज्य परिवहन महामंडळाने केली होती़ यात नंदुरबार आगारानेही हिरिरीने सहभाग घेत 22 बसेसची नियुक्ती केली होती़ या बसेसने 10 ते 15 जुलै या पाच दिवसात तब्बल 92 फे:या करुन भाविकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन घडवल़े नंदुरबार आगारातून सोडण्यात आलेल्या या बसेससाठी 22 वाहक आणि चालक यांची नियुक्ती करण्यात आली होती़ बसमध्ये येणा:या सवलतीच्या आणि विना सवलतीच्या प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करत पंढरपूर यात्रेला सुरुवात करणा:या चालक-वाहकांच्या परिश्रमातून पाच दिवसात 9 लाख 47 हजार 761 रुपयांची कमाई शक्य झाली आह़े प्रती किलोमीटर 30 रुपये प्रमाणे मिळालेल्या या रकमेमुळे नंदुरबार आगाराने धुळे विभागातून अव्वल स्थान मिळवल्याची माहिती देण्यात आली आह़े पाच दिवस सुरु असलेल्या या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या 22 बसेसची योग्य ती स्वच्छता आणि काळजी घेतली गेल्याने प्रवाशांनीही पसंती दिली होती़ विशेष करुन नंदुरबार शहर, तालुक्यासह लगतच्या गुजरात राज्यातील प्रवाशांनी बसेसमधून प्रवास केला होता़ या उपक्रमासाठी आगारप्रमुख मनोज पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले होत़े नंदुरबार ते पंढरपूर अशी दैनंदिन बससेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरु असल्याने त्याचाही लाभ झाल्याचे सांगण्यात आले आह़े
नंदुरबार आगाराने साडेचार हजार भक्तांना घडवले विठुरायाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:14 IST