शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार अपघात स्थळ सुधारणा कार्यक्रम : 1 कोटींच्या कामांना मिळणार मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणा:या अपघात स्थळांच्या सुधारणा कार्यक्रमाच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आह़े गुरुवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक पार पडत आह़े या वेळी कामांच्या मंजुरीचे पत्रही (वर्कऑर्डर) मिळण्याची शक्यता  आह़ेजिल्ह्यातील अपघातांच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत ‘लोकमत’तर्फे सविस्तर वृत्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणा:या अपघात स्थळांच्या सुधारणा कार्यक्रमाच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आह़े गुरुवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक पार पडत आह़े या वेळी कामांच्या मंजुरीचे पत्रही (वर्कऑर्डर) मिळण्याची शक्यता  आह़ेजिल्ह्यातील अपघातांच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत ‘लोकमत’तर्फे सविस्तर वृत्त देण्यात आले होत़े त्यानंतर प्रशासन चांगलेच कामाला लागले असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये रंगत आह़े अपघात स्थळ सुधारणा कार्यक्रम 2017-2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  नंदुरबारअंतर्गत 1 तर नवापूर विभागांतर्गत 2 कामे प्रस्तावित आहेत़ या कामांसाठी एक कोटी 10 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल़े या कामांपैकी, नंदुरबार उपविभागअंतर्गत राज्य महामार्ग क्रमांक 6 वरील पाळधी, अमळनेर, दोंडाईचा, नंदुरबार धानोरा रस्त्यावरील साधारणत 1 किलो मीटरच्या रस्त्यावरील अपघात स्थळाच्या सुधारणेसाठी 50 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत़ तसेच नवापूर विभागाअंतर्गत येणा:या राज्य महामार्ग पाचवरील नांदुर्खे, कडुपाडा खोकसे, बोरपाडा, हळदाणी,विसरवाडी, नंदुरबार, प्रकाशा, शहादा, खेतीया या मार्गावरील अपघात स्थळ क्षेत्राच्या सुधारणेसाठी 30 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत़ तर, राज्य महामार्ग 14 वरील नवापूर, पिंपळनेर, साक्री या मार्गावरील अपघातस्थळांसाठीही 30 लाख रुपयांची कामे करणे गरजेचे आहेत़धुळे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयात डेपोटी सेक्रेटरी इंगोले यांनी विभागाच्या अधिका:यांची बैठक घेतली होती़ त्यात त्यांनी अपघातग्रस्थ स्थळांची व प्रस्तावित कामांची माहिती घेण्यात आली़ गेल्या महिनाभरापूर्वी नंदुरबार व नवापूर उपविभागाकडून अपघातग्रस्त स्थळांसाठी लागणा:या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला                   आह़े नवापूर तालुक्यातील चरनमाळ घाटात मोठय़ा संख्येने अपघात होत असतात़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घाटालाही ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले आह़े त्यासह खोकसे, दापुर, हळदाणी, विसरवाडी याही भागात ब्लॅक स्पॉट सुधारणा समितीने सुचविल्यानुसार वळण सुधारणा करण्याचे काम प्रास्तावित करण्यात आले आह़े जिल्ह्यात ब:याच अपघातग्रस्त स्थळांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा व तळोदा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अपघातग्रस्त स्थळांची बरीच कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता ङोलसिंग पावरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ नंदुरबार व नवापूर उपविभागांतर्गत तीन मोठे अपघातस्थळ येतात़ सध्या या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली असली तरी कामांची निवीदा प्रक्रिया लवकरात लवकर राबवून अपघातप्रणव स्थळांची लवरात लवकर सुधारणा करण्यात यावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत  आह़े़