शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

नंदुरबार 300 ग्रामपंचायत कार्यालये सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:24 IST

कामकाज : जनसुविधा योजनेत 179 इमारती झाल्या नवीन

नंदुरबार : गावांचा सर्वागिण विकास होण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाची कार्यालये बांधून देण्याची योजना शासनाने आणली होती़ यातून नंदुरबार जिल्ह्यातील 300 ग्रामपंचायत कार्यालये सुसज्ज झाली आहेत़ प्रत्येकी 10 लाख रूपयांत बांधलेल्या या कार्यालयांमध्ये कामांना वेग आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े शासनाने पाच वर्षापूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार हमी योजनेतून गावांमध्ये कामही उपलब्ध करून द्यावे आणि विकासात्मक कामही व्हावे, या उद्देशातून राजीव गांधी भवन अर्थात ग्रामपंचायत निर्मितीची कामे सोपवली होती़ नंदुरबार जिल्ह्यातील 313 गावांनी यात सहभाग नोंदवला होता़ गेल्या चार वर्षात यातील 295 कामे पूर्ण झाली आहेत़ यातून कुशल आणि अकुशल कामगारांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला असून उर्वरित 23 कामांनाही वेग आला आह़े 2010 पासून लागू करण्यात आलेल्या या योजनेत नंदुरबार जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक चांगले काम केल्याचा निर्वाळा नुकताच ग्रामविकास विभाग आणि रोहयो विभागाला दिला होता़ 2018 अखेर जिल्ह्यात 272 कामे पूर्ण झाली आहेत़ यात नंदुरबार 60, नवापूर 76, शहादा 77, तळोदा 25, अक्कलकुवा 33 तर धडगाव तालुक्यात 1 ठिकाणी राजीव गांधी भवनाचे काम पूर्ण झाले आह़े या ग्रामपंचायतींनी केलेल्या 10 लाख रूपयांची मागणी बांधकामासाठी रोहयोकडून पूर्ण करण्यात आल्याने ही कामे पूर्ण झाली आहेत़ 2010 पासून एकूण 213 कामांना मंजूरी देण्यात आली होती़ यात 295 कामे ही तात्काळ सुरू झाली़ यातील 272 कामे पूर्ण झाली आहेत़ तर नंदुरबार 18, नवापूर 3, शहादात तालुक्यात 2 ठिकाणी कामे अपरूण आहेत़ या कामांना गती देण्यासाठी रोजगार हमी योजना विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े धडगाव तालुक्यात एकूण सात ग्रामपंचायतींना मंजूरी होती़ परंतू यातील केवळ 1 ग्रामपंचायतीने भवन पूर्ण केल़े जिल्ह्यात आजअखेरीस 63 ग्रामपंचायतींच्या कार्यालयांची दुरवस्था झाल्याने त्यांच्याकडून जिल्हा परिषदेकडे दुरूस्ती किंवा नूतनीकरणासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत़ यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत अद्याप कारवाई झालेली नाही़  गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेद्वारे 179 ग्रामपंचायत कार्यालयांना इमारत बांधून दिली आह़े 2012 पासून सुरू झालेल्या योजनेत प्रत्येकी 12 लाख रूपयांचा निधी ग्रामपंचायतींना देण्यात येत आह़े यंदाच्या 2017-18 या वर्षात जिल्ह्यात 34 ग्रामपंचायतींनी योजनेचा लाभ घेतला तर चालू आर्थिक वर्षात 50 ग्रामपंचायतींनी निधी देण्याचे प्रस्तावित आह़े ग्रामीण स्तरावर निर्माण झालेल्या या इमारतींचे सुशोभिकरण ब:याच ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून करून घेतले होत़े यात वृक्षारोपण आणि इतर शोभेची कामे करण्यात आली आह़े ग्रामसचिवालय अशी संकल्पना जिल्ह्यात पूर्ण होत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी सातत्याने इमारत बांधकाम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत़ विकासकामातून रोजगार मिळत असल्याने गावातील कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळाला आह़े गेल्या आठ वर्षात योजनेच्या माध्यमातून 1 हजार 700 कामगारांना रोजगार मिळाल्याचो रोहयोकडून सांगण्यात आले आह़े येत्या काळात 77 इमारतींची कामेही रोहयोतून होणार आहेत़