शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

नंदुरबार : पाच निवडणुकांमध्ये २९ उमेदवारांनी अजमावले नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:37 IST

चार वेळा काँग्रेस तर एक वेळा भाजपचा विजय

नंदुरबार : मतदार संघात गेल्या पाच निवडणुकीत एकुण २९ उमेदवारांनी आपले नशीब अजमले. त्यात आठ अपक्षांचा देखील समावेश आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १९९८ ते २०१६ पर्यंतच्या पाच निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्टÑवादी, समाजवादी पार्टी यासह इतर पक्षांच्या उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. पाच पैकी चार वेळा काँग्रेसचे माणिकराव गावीत तर एक वेळा भाजपच्या डॉ.हिना गावीत या विजयी झाल्या आहेत. १९९८ मधील निवडणुकीत एकुण पाच उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे कुवरसिंग वळवी यांच्यात मुख्य लढत होती. माणिकराव गावीत विजयी झाले. अवघ्या वर्षभरात अर्थात १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे कुवरसिंग वळवी यांच्यात लढत झाली. एकुण चार उमेदवार रिंगणात होते. यावेळी देखील माणिकराव गावीत विजयी झाले. २००४ मध्ये मध्ये एकुण पाच उमेदवार होते. लढत काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे डॉ.सुहास नटावदकर यांच्यात रंगली. माणिकराव गावीत हे विजयी झाले.२००९ मधील निवडणुकीत एकुण सात उमेदवार रिंगणात होते. यावेळी प्रथमच तिरंगी लढत रंगली. काँग्रेसचे माणिकराव गावीत, भाजपचे सुहास नटावदकर व समाजवादी पार्टीचे शरद गावीत यांच्यात लढत झाली. यावेळीही माणिकराव गावीत हे विजयी झाले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकुण आठ उमेदवार रिंगणात होते. पैकी काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपच्या डॉ.हिना विजयकुमार गावीत यांच्यात लढत रंगली. डॉ.हिना गावीत यांनी भाजपच्या माध्यमातून विजय मिळविला. मतदारसंघात प्रथमच काँग्रेसेतर उमेदवार विजयी झाला.