शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

संचारबंदीमुळे थांबले नंदुरबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने दर रविवारी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने दर रविवारी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दिले आहेत़ यांतर्गत संचारबंदीच्या पहिल्याच रविवारी शहर थांबल्याचे चित्र होते़ जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी नागरिक स्वच्छेने घराबाहेर पडत नसल्याने हा प्रयोग यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत़जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर पोलीस आणि महसूल प्रशासन शनिवारपासूनच या संचारबंदीची तयारी करत होते़ यातून जागोजागी बॅरीकेड लावण्यासह बंदोबस्ताचे पॉर्इंट ठरवण्यात आले होते़ सकाळी ९ वाजेपासून संचारबंदी सुरू होणार असल्याने दुध, वृत्तपत्र आणि भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळी ९ पूर्वी आपले वितरण पूर्ण करुन घेतले होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयाला नागरिकांनी स्वच्छेने पाठिंबा देत घराबाहेर पडणे टाळले होते़ शहरातील दवाखाने आणि औषधी विक्रीची दुकाने वळगता इतर एकही दुकान किंवा व्यवसाय सुरू नसल्याचे चित्र दिसून आले़ ग्रामीण भागातून येणारी वाहनेही बंद असल्याने रस्ते निर्जन झाले होते़ शहरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी मुख्य रस्त्यावर जागोजागी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते़

दरम्यान संचारबंदी असली तरीही काहींना शहरात फेरफटका मारण्याचा मोह आवरला गेला नव्हता़ अशा उत्साहींवर कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेने पथकांची निर्मिती केली होती़ यांतर्गत दिवसभरात ३० दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करुन दंडाची वसुली करण्यात आली़ फिजीकल डिस्टन्सिंग न करता फिरणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी दणका दिला़

शहरातील सिंधी कॉलनी, गिरीविहार, हाट दरवाजा, गांधी पुतळा, नेहरु चौक, बसस्थानक परिसर, अंधारे चौक, स्टेट बँक चौक, मोठा मारुती, धुळे चौैफुली, सुभाष चौक, मंगळ बाजार आदी परिसरात पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे दिसून आले़ शहरातील बहुतांश नागरिक दर रविवारी सकाळी चिकन आणि मटणाच्या दुकानात हजेरी लावतात़ परंतु संचारबंदीमुळे ही दुकानेही बंद होती़ रहिवासी वसाहतींसह शहराबाहेर असलेल्या रहिवासी वसाहतीतही सकाळी ९ पूर्वी भाजीवाले दिसून आले होते़ ९ नंतर या वसाहतींमध्येही शुकशुकाट होता़ महामार्गावर वाहतूक पोलीसांकडून गस्त करुन वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली़