शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ईको डिङोलच्या नावाने 34 लाखात फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:02 IST

नंदुरबार : बाजारभावापेक्षा 2 रूपये स्वस्त दराने तसेच पर्यावरणाला पूरक असे ईको डिङोल विक्री करण्याचा पंप देण्याच्या नावाने मलोणी ता़ शहादा येथील उद्योजकाची 34 लाख रूपयात फसवणूक करण्यात आली आह़े याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मुंबई येथील इंडीङोल या कंपनीने माय ईको एनर्जी नावाचे ईको डिङोल बाजारात विक्रीसाठी ...

नंदुरबार : बाजारभावापेक्षा 2 रूपये स्वस्त दराने तसेच पर्यावरणाला पूरक असे ईको डिङोल विक्री करण्याचा पंप देण्याच्या नावाने मलोणी ता़ शहादा येथील उद्योजकाची 34 लाख रूपयात फसवणूक करण्यात आली आह़े याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मुंबई येथील इंडीङोल या कंपनीने माय ईको एनर्जी नावाचे ईको डिङोल बाजारात विक्रीसाठी आणण्याची जाहिरातबाजी करत गुंतवणूकदारांना आकर्षित केले होत़े यातून मलोणी येथील उद्योजक  विलास पाटील एप्रिल 2017 मध्ये संबधित कंपनीसोबत संपर्क करत डिङोल पंपाची डिलरशिपसाठी अर्ज केला होता़ या अर्जानंतर पाटील यांना डिङोल कंपनीच्या प्रतिनिधींनी भेट देत डिङोल पंप देण्याबाबत प्रतिकूलता दर्शवत कागदपत्रे आणि  पैशांची मागणी केली होती़ मागणीनुसार पाटील यांनी ईंडीङोल कंपनीच्या  बँक खात्यामध्ये 34 लाख 3 हजार रूपये जमा करून दिले होत़े यानंतर  तिखोरा ता़ शहादा शिवारात डिङोल पंपासाठी जागा अधिग्रहीत करण्यासह बांधकाम करण्यात आले होत़े  याठिकाणी डिङोल पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करूनही ते मिळाले नाही, डिङोल मिळत नसल्याने गुंतवलेली रक्कम परत मागून देण्यात आली नाही़ ऑगस्ट 2018 र्पयत हा प्रकार सुरु होता़ संबधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विलास पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ईडीङोल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष वर्मा अलुरी, सचिन साहेबराव लबाडे, जयंत जगन्नाथ केसकर, सारिका अनिरूद्ध शिंदे, सेल्स मॅनेजर सतीष बुरले, सेल्स मॅनेजर शहानवाज खान सर्व रा़ मुंबई, कंपनीचा नाशिक विभागाचा एरिया सेल्स मॅनेजर किशोर सिंग रा़ नाशिक व समंद करंळे रा़ लोणखेडा ता़ शहादा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े