शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

बांबू कापल्याच्या रागातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतातील बांबूची झाडे कापल्याच्या वादातून एकाला बांबूनेच मारून ठार केल्याची घटना खडकीचा गुराडपाडा, ता.धडगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतातील बांबूची झाडे कापल्याच्या वादातून एकाला बांबूनेच मारून ठार केल्याची घटना खडकीचा गुराडपाडा, ता.धडगाव येथे २९ रोजी घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध म्हसावद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास अटक करण्यात आली.जलसिंग होणाऱ्या रावताला (३५) रा.खडकीचा आमदरीपाडा असे मयताचे नाव आहे. तर प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक, रा.खडकी, ता.धडगाव असे अटक केलेल्य संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, जलसिंग रावताला यांच्या शेतातील बांबूची झाडे प्रकाश उर्फ सान्या नाईक यांनी कापले होते. त्यावरून त्यांच्यात होळीच्या सुमारास वाद देखील झाला होता. वाद आपसात झाल्याने त्यांनी पोलिसात न जाता आणि कुणाला काहीही न सांगता वाद मिटविला होता.मात्र २९ आॅगस्ट रोजी त्याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात सान्या नाईक यांनी जलसिंग रावताला यांना बांबूने डोक्यावर, कपाळावर, नाकावर व छातीवर बेदम मारहाण केली. त्यात त्यांन गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मेरवान होणाºया रावतळे यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लागलीच प्रकाश उर्फ सान्या नाईक यास अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार करीत आहे.