लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लहान मुलांच्या पतंग उडविण्याच्या किरकोळ वादातून दोन कुटूंबात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारातील जुना बैलबाजार परिसरात शनिवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. खुनाच्या गुन्ह्यातील संशयीतांना अटक करण्यात आली आहे.हरूण युसूफ कुरेशी (५५)रा. जुना बैला बाजार असे मयताचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी लहान मुलं पतंग उडवीत असतांना त्यांच्यात वाद झाला. सायंकाळी वाद मिटल्यानंतर रात्री उशीरा मारहाण झाली. लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई याचा वापर करण्यात आला. हरूण कुरेशी यांना जबर मार लागल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. त्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला. तातडीने वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला.याबाबत लियाकत शाहीद बागवान, रा.अलीसाब मोहल्ला, जुुना बैल बाजार यांच्या फिर्यादीवरून शाहरूख सलीम पटवे, नईम कलीम पटवे, समीर कलीम पटवे, असलम पटवे, मोसीन पटवे, सलमान पटवे, मुन्ना पटवे, कलीम पटवे, सना पटवे, नसरद पटवे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद शाहरूख पटवे यांनी दिली. त्यावरून लियाकत बागवान, अरबाज बागवान, समिर बागवान, युनूस बागवान यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील संशयीतांना अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ दिवटे करीत आहे.
पतंग उडविण्याच्या वादातून नंदुरबारात एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:37 IST