शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चौगाव येथे मोबाईल चोरीच्या संशयातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:51 IST

चौगाव येथील घटना : संशयीत दाम्पत्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोबाईल चोरल्याच्या संशयातून दाम्पत्याने एकास बांधून ठेवत बेदम मारहाण केल्याची घटना चौगाव, ता.तळोदा येथे ३० एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी संशयीत दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.भाईदास रोहिदास ठाकरे (३७) रा.चौगाव, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे. तर सुवर्ण भरत वळवी व मंगलाबाई सुवर्ण वळवी दोन्ही रा.चौगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, ३० एप्रिल रोजी भाईदास ठाकरे याने सुवर्ण वळवी यांच्या घरातून मोबाईल चोरला असा संशय वळवी दाम्पत्याने घेतला. त्यावरून त्यांनी भाईदास ठाकरे यांना धरून आणत दोरीने बांधून ठेवले. काठ्यांने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.याबाबत बाबू दगा ठाकरे, रा.चौगाव यांनी तळोदा पोलिसात फिर्याद दिल्याने संशयीत दाम्पत्य सुवर्ण वळवी व मंगलाबाई वळवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रकाश मेढे, पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार पाकळे करीत आहे. घटनेनंतर चौगाव गावात जमावाकडून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुवर्ण वळवी यास मारहाण करण्यात आली होती़ रात्री घडलेल्या या प्रकारावेळी गावात तणाव निर्माण झाल्याने तळोदा येथून पोलीस मागवण्यात आला होता़ सुवर्ण वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाबू दगा ठाकरे, निराकार बाबू ठाकरे, रोहिदास दगा ठाकरे, गुलाब दगा ठाकरे, धनराज भाईदास ठाकरे, सुधाकर गुलाब ठाकरे, रमेश जाधव ठाकरे सर्व रा़ चौगाव यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मारहाणीत सुवर्ण वळवी याच्या दातांना दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली़