शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचा:यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पालिका कर्मचा:यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ कर्मचा:यांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिका कर्मचा:यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ कर्मचा:यांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. दरम्यान, 1 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. पालिका कर्मचा:यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटना एकवटल्या आहेत. शासन लक्ष देत नसल्यामुळे 1 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने शनिवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान भजन म्हणत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रय} करण्यात आला.कर्मचा:यांच्या मागण्यांमध्ये जानेवारी 2016 पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा. 2000 पूर्वीच्या सर्व रोजंदारी कर्मचा:यांना कायम करावे. नगर पंचायतीमधील कर्मचा:यांची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी. सफाई कामगारांना मुकादम पदावर तसेच त्यांच्या वारसांना वरिष्ठ पदावर पदोन्नती द्यावी, लाड कमिशनच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना नेमणुका द्याव्या, मोफत घरे बांधून द्यावी.स्वच्छता निरिक्षकांचा राज्यस्तरीय संवर्ग डिसेंबरपूर्वी करण्यात यावा. सफाई विभागाची ठेका पद्धती बंद करावी, सफाई आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील वर्ग चार च्या कर्मचा:यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग तीनच्या जागेवर पदोन्नती द्यावी. 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अभियांत्रिकी सेवेतील कर्मचा:यांना न्यायालयीन निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे पदनाम देवून सुधारीत वेतन श्रेणी लागू करावी. अगिAशमन संवर्गातील कर्मचा:यांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे पदोन्नती द्यावी. सहा संवर्गातील 25 टक्के जागेवर नगर परिषद कर्मचा:यांमधून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार परीक्षेची अट शिथील करून सरळ समावेशन करावे. संवर्ग कर्मचा:यांना मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देणे व पदोन्नतीमध्ये 50 टक्के जागा संवर्ग कर्मचा:यांमधून भराव्या यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबधीतांना देण्यात आले आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र एम.पाखले व सचिव शशिकांत वाघ यांच्यासह पदाधिकारी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.दरम्यान, शहादा व तळोदा येथे देखील आंदोलन करण्यात आले.