शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सफाई कामगारांना मिळणार सार्वजनिक सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

सफाई कामगारांच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष कुंदन थनवार यांनी पालिकेला निवेदन दिले होते. ...

सफाई कामगारांच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष कुंदन थनवार यांनी पालिकेला निवेदन दिले होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यादेखील पालिका कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजूर करण्याचे आणि समस्या सोडवण्याचे आदेशित करण्यात आले होते. मात्र पालिका सफाई कर्मचार्‍यांचे प्रश्न सुटले नाहीत. पर्यायाने २७ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थनवार यांनी या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. २९ जानेवारीला पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उपोषण मागे घेण्यात आले.

विविध मागण्यांमध्ये नंदुरबार पालिकेच्या सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची पूर्तता करण्यासाठी शिंदे यांनी पालिकेच्या सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्टी देण्याचे घोषित केले. याबाबतच्या पत्रात म्हटले आहे, की पालिकेच्या कायम सफाई कर्मचार्‍यांना सार्वजनिक सुट्टी देण्यात येईल. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याची आवश्यकता नाही. जर काही कारणास्तव कामावर बोलावण्यात आले तर त्याची तशी वेगळी नोंद घेऊन त्यांना नंतर पर्यायी सुट्टी दिली जाईल.

मुख्याधिकारी यांचा सत्कार

सफाई कामगारांच्या मागण्या मंजूर होत आहेत. काही मागण्यांबाबत विचार सुरू आहे. सार्वजनिक सुट्टी देण्याबाबतचे पत्र संघटनेला देण्यात आले. म्हणून सफाई कामगार संघटनेतर्फे थनवार यांनी राजेंद्र शिंदे यांचा त्यांच्या दालनात सत्कार केला. यावेळी रामसिंग थनवार, नंदू बैसाणे रोनेश तेजी, दिनेश टाक, डान्स सर जित धनवार, मेघराज थनवार, फकिरा नखाडे, धरम कडोसे, नटवर कोळी, दिनेश बट्ट, लखन जाधव, सोनू भिडे, जीवन भगवाने आदी उपस्थित होते.