शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालिका अत्याचारप्रकरणी नंदुरबारात निषेध मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:25 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : दोंडाईचा येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी सोमवारी नंदुरबारात निषेध मोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक, हाताला काळी पट्टी बांधून तरुण, तरुणी, महिला व नागरिक हजारोंच्या संख्येने त्यात सहभागी झाले. शहरातील विविध भागातून फिरून मोर्चा साक्री नाक्यावर गेल्यावर तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मोर्चातील शिस्त व ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : दोंडाईचा येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी सोमवारी नंदुरबारात निषेध मोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक, हाताला काळी पट्टी बांधून तरुण, तरुणी, महिला व नागरिक हजारोंच्या संख्येने त्यात सहभागी झाले. शहरातील विविध भागातून फिरून मोर्चा साक्री नाक्यावर गेल्यावर तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मोर्चातील शिस्त व संयम पहाण्यासारखा होता.दोंडाईचा येथील बालिकेवर शाळेत अत्याचार करणा:या आणि संशयीताला संरक्षण देणा:या आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी विविध समाज आणि संस्था, संघटनांतर्फे सोमवारी, दुपारी चार वाजता निषेध मूकमोर्चा काढण्यात आला. तैलिक मंगल कार्यालयापासून निघून मोर्चा गणपती मंदीर, नगरपालिका, हुतात्मा चौक, सोनारखुंट, टिळकरोड, जळकाबाजारमार्गे साक्रीनाक्यावर गेला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर तहसीलदारांना तेथेच निवेदन देण्यात आले. मोर्चात अग्रभागी तरुणी त्यानंतर, विद्यार्थीनी, महिला व नागरिक सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात निषेधाचे फलक होते. डोक्यावर निषेध लिहिलेल्या गांधी टोप्या होत्या.शिस्त आणि संयमनिषेध मूकमोर्चा असल्यामुळे त्यात शिस्त आणि संयम दिसून आला. चार, चार जणांच्या रांगांनी अतिशय शिस्तीत मोर्चा मार्गक्रमण करीत होता. रस्त्याने येणा:या-जाणा:या वाहनधारकांना विनंती करून मोर्चात व्यत्यय येणार नाही यादृष्टीने प्रयत्न केला जात होता. ठिकठिकाणी स्वयंसेवक देखील नेमण्यात आले होते. त्यांच्यातर्फे मोर्चातील रांगेचे नियोजन करणे, पोलिसांना सहकार्य करणे, कुणाला काही अडचण असल्यास मदत करणे यासह पाणी पाऊच पिऊन रस्त्यावर फेकल्यानंतर ते गोळा करणे आदी कामे होती.उन्हाची तीव्रता असतांनाही मोर्चेकरी मोठय़ा संख्येने त्यात सहभागी झाले होते.साक्रीनाक्यावर सभामूकमोर्चा साक्री नाक्याजवळ आल्यावर तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अ‍ॅड.उमा चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, शितल चौधरी, मिनाक्षी भदाणे, डॉ.तेजल चौधरी, सीमा मोडक, सुप्रिया कोतवाल, अर्चना चव्हाण, पुष्पा थोरात, रेखा वाघ, यशोदा शर्मा आदी महिलांसह अमदार शिरिष चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, मोहन माळी आदींनी मनोगत व्यक्त केले. अशा घटना यापुढे घडू नये यासाठी घटनेतील आरोपींना कडक शिक्षा करावी, त्यांना पाठीशी घालणा:यांनाही कडक शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.तहसीलदारांना निवेदनमोर्चा तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर न नेता तो साक्री नाक्यावर येवून तेथे सभेत रुपांतर झाल्यावर विसजिर्त करण्यात आला. यावेळी निवेदन स्विकारण्यासाठी तहसीलदार नितीन पाटील हे स्वत: उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.पोलीस बंदोबस्तनिषेध मूकमोर्चा ज्या भागातून जाणार होता त्या भागात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. काही भागातील वाहतूकही वळविण्यात आली होती. वाहनचालक व नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले.