शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जीवांची होऊन उतराई, आली घरोघरी आनंदाची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाय-वासरुचे पूजन करुन शहरात वसुबारस साजरी करण्यात आला़ अत्यंत भक्तीभावाने झालेल्या या पूजनानंतर घरोघरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाय-वासरुचे पूजन करुन शहरात वसुबारस साजरी करण्यात आला़ अत्यंत भक्तीभावाने झालेल्या या पूजनानंतर घरोघरी आनंदाची दिवाळी साजरी करण्यास सुरुवात झाली आह़े तत्पूर्वी दुपारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती़ शहरातील सुभाष चौक, मंगळ बाजार, हुतात्मा चौक, सोनार गल्ली यासह विविध ठिकाणी खरेदीसाठी दिवसभर नागरिकांची गर्दी होती़ वसुबारस आणि लक्ष्मीपूजनासाठी लागणा:या पूजा साहित्यासह सोने चांदी खरेदीलाही पसंती दिली जात होती़ यातून दिवसभरात कोटी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली़ पणत्या, पूजनासाठी लागणारी केरसुणी, बत्तासे, ङोंडू आणि इतर फळांची दिवसभर मोठी विक्री झाली़ शहरात यंदाही तयार फराळाची खरेदी मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून आल़े महिलांकडून घरी पदार्थ तयार करण्यापेक्षा मिठाई विक्रेत्यांना प्राधान्य देत खरेदी केल्याने विक्रेत्यांकडेही गर्दी झाली होती़  निवडणूकीचे कामकाज संपून वेळ मिळाल्याने शासकीय कर्मचारी, शिक्षक यांनी बाजारात हजेरी लावत उलाढालीत हातभार लावला़ नंदुरबार शहरातील सराफ बाजारात सोने व चांदीचे दागिने तसेच विविध वस्तू खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी हजेरी लावली़ धनत्रयोदशी निमित्त सोने खरेदीची परंपरा असल्याने अनेकांनी सोने चांदीचे दागिने खरेदी केल़े यातून सोने बाजारात 1 कोटीच्या पुढे उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े सोने दर हे गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याने खरेदीत वाढ झाली़