शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

अवघ्या एक रुपया भाडे पट्टय़ाने गाळ जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फेविविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता जलसंपदा, मृद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फेविविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील, तलावाखालील गाळपेर जमीन शेतक:यांना रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पीक उत्पादनासाठी नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्टयावर देण्यात येणार आहे. दरम्यान, मका व ज्वारीचे 22 टन बियाणे सिंचन सुविधा असलेल्या पाच हजार 166 शेतक:यांना चारा उत्पादनासाठी वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील चार तालुके पुर्ण तर दोन तालुक्यांमधील काही मंडळे ही दुष्काळी जाहीर करण्यात आली आहेत. अपु:या पजर्न्यमानामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई देखील मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.चा:याची उपलब्धता जिल्ह्यात एकुण जनावरांची संख्या लक्षात घेता मोठय़ा पाळीव जनावरांची संख्या चार लाख पाच हजार 75, शेळ्या, मेंडय़ांची संख्या दोन लाख 85 हजार 904 इतकी आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार पडीकक्षेत्र वनक्षेत्र तसेच खरीप पिकांपासून मिळणारा चारा उपलब्ध पशुधनास पुढील चार महिन्यासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात उत्पादीत होणारा चारा जिल्हाबाहेर वाहतुकीस व विक्रीस जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत मका, ज्वारीचे 22 टन इतके बियाणे जिल्ह्यातील पाच हजार 16 शेतक:यांना चारा उत्पादनासाठी मोफत वाटप करण्यात आले आहे. नाममात्र भाडय़ाने गाळ जमीनजिल्ह्यातील जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील , तलावाखालील गाळपेर जमीनी शेतक:यांना चारा पीक उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात अवघ्या 1 रुपये नाममात्र दराने भाडेतत्वावर ते उपलब्ध होणार आहे. जेणेकरून गाळपेर जमीनीमध्ये जनावरांसाठी सुयोग्य अशी वैरण व चारापिके घेता येतील. तसेच शेतक:यांकडे उपलब्ध अलसेली वैरण निकृष्ठ चारा सकस करणे, चारा कटाई करून पशुधनास खाण्यासाठी वापरणे, अझोला निर्मिती आदी उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील पशुपालक शेतक:यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे.आठ विहिरी अधिग्रहीत तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार तालुक्यातील 32 गावांपैकी आठ गावात तहसीलदारांनी खाजगी विहिरी अधिग्रहीत करून त्याद्वारे गावक:यांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यात तलवाडे बुद्रूक, रनाळे, घोटाणे, बलवंड, निंबोणी, दहिंदुले, वेळावद, मांजरे या गावांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात आणखी काही गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. मजुरांना कामे उपलब्धजिल्ह्यातील मजुरांना कामाअभावी परराज्यात, परजिल्ह्यात स्थलांतरीत होऊ नये यासाठी गावातच रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात येत्या वर्षभरात 93 हजार 929 मजूर क्षमतेची 27 हजार 906 कामे मंजुर करण्यात आली आहेत. त्यावर 40 कोटी नऊ लाख रुपये खर्चाची तरतूद देखील जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात एक हजार 187 कामे सुरू असून त्यावर पाच हजार 748 मजुर कार्यरत आहेत. मागेल त्याला काम देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.चार महिना पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा अहवाल कृषी विभागाने आधीच दिला आहे. रब्बी हंगाम देखील यंदा अपेक्षीत प्रमाणात येणार नसल्यामुळे रब्बी पिकांपासूनचा चारा देखील उपलब्ध होणार नाही.त्यामुळे जास्तीत जास्त चारा उत्पादन व्हावे यासाठी कृषी विभागाचा प्रय} सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी याबाबत आढावा बैठका देखील वेळोवेळी घेतल्या आहेत.