शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

खासदार हीना गावीतांवर आमदार पाडवींच्या आरोपामुळे भाजपात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 12:45 IST

क्षांतर्गत खळबळ उडाली

ठळक मुद्दे

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 22- भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुन्हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षा व खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यावर आरोप केल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आह़े सोमावल ता़ तळोदा येथील गॅस वाटप कार्यक्रमात आमदार उदेसिंग पाडवी हे म्हणाले होते की, मतदारसंघात आपला प्रभाव वाढत आह़े त्यामुळे मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते, ते मिळू नये, यासाठी खासदार डॉ़ हीना गावीत यांच्याकडून डावलले जात आह़े शहादा तळोदा मतदारसंघात विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या गॅस शेगडी वाटप कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक लांब ठेवले जात आह़े खासदार डॉ़ गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या उपस्थितीत बोरद, मोड, तळवे, आमलाड, रोझवा, सोमावल, या ठिकाणी गॅस शेगडी वाटप कार्यक्रम झाले, सोमावलच्या मुख्य कार्यक्रमात बोलवण्यात आले नाही़ निवडून आल्यापासून सतत हा अनुभव येत आह़े विधानसभा निवडणूकीतही माझा पराभव व्हावा, म्हणून त्यांचे प्रयत्न होते असा आरोप त्यांनी केला़निवडणूका आल्या की त्यांचे आरोप सुरू होतात - खासदार हीना गावीतआमदार उदेसिंग पाडवी हे माङया वडीलांसमान आहेत़ आम्ही दोघे एकाच पक्षाचे आहोत़ भाजपमध्ये एक वेगळी शिस्त आह़े त्यामुळे जर आमदार पाडवी यांना काही सांगायचे होते तर त्यांनी थेट मला सांगितले असते, तर बरे झाले असते, पण निवडणूका आल्या की, ते सातत्याने असेच आरोप करतात़ गॅस वाटप कार्यक्रमासंदर्भात पक्षाच्या शिस्तीनुसार तालुकाध्यक्षांमार्फत निरोप व निमंत्रण दिले होत़े असे  असतानाही त्यांनी आपल्याला डावलले जाते हे आरोप करणे चुकीचे आह़े आपण त्यांच्या मतदारसंघात पक्ष कार्य वाढवण्यासाठीच कार्यक्रम घेत असल्याने याचा उलट त्यांनाच फायदा होणार आह़े एक खासदार या नात्याने आपल्याला संपूर्ण मतदारसंघात फिरावे लागते, केंद्राच्या व विकासाच्या योजना लोकांर्पयत पोहोचवण्यासाठी काम करावे लागत़े आपण पक्षाच्या शिस्तीत राहूनच काम करीत असून आमदार पाडवी यांचे आरोप गैरसमजातून आहे, की हेतूत: आहेत ते कळत नाही़