यावेळी पोलिसांनी अटकाव केला, परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट नगरपालिकेच्या कार्यालयात कचरा फेको आंदोलन केले. जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा घेण्यात आला. त्यानंतर, नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिले. घनकचरा कामगारांचे जुलै, २०२१ या महिन्याने वेतन नगरपरिषदेने मक्तेदारास अदा केलेले असल्याने, ते येत्या दोन दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी दिले.
कुशल अकुशल कामगार यांच्या वेतनाबाबत येत्या १५ दिवसांत मागील ठेकेदाराची चौकशी करून, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. जोपर्यंत संबंधित ठेकेदार यांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या ठेकेदारास पुढील काम देण्यात येणार नाही. नवापूर शहरातील स्वच्छतेसाठी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नियमित केली जात असून, शहर स्वच्छ राहील, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, असे पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावीत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाणे, शहराध्यक्ष प्रणव सोनार, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे, दिनेश चौधरी, कमलेश छत्रीवाला, अजय गावीत, माजी नगरसेविका सुनीता वसावे, दुर्गा गावीत, वेलजी गावीत, भाविन राणा, जिग्नेशा राणा, घनश्याम परमार, गोपी सैन, संदीप पाटील, कुणाल दुसाणे, शाहरूख खाटीक आदी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.