शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील हिंस्र प्राण्यांचा संचार गंभीर दुर्घटनेला देतोय आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

तळोदा तालुका व वनक्षेत्रातील बिबट्यांचा शेतशिवारात संचार होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. यावर अंकुश लावण्यात वनविभाग गेल्या काही वर्षांत ...

तळोदा तालुका व वनक्षेत्रातील बिबट्यांचा शेतशिवारात संचार होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. यावर अंकुश लावण्यात वनविभाग गेल्या काही वर्षांत कमी पडत आहे. गेल्या महिनाभरात तळोदा शहरवासीयांना तीन ते चार वेळा बिबट्याने अस्तित्वाची प्रत्यक्ष जाणीव करून दिली आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले गेले आहेत. परंतु, वनविभागाकडून बिबट्याने या भागात शिकार केल्याची कोणतीही खूण समोर न आल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. बिबट्याने एखादा पशू, प्राणी किंवा तत्सम सजिवाची शिकार केल्यानंतर वनविभागाकडून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तोवर हा बिबट्या निरुपद्रवी ठरवून दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तळोदा शहरालगतच्या आमलाड रस्ता भागात बिबट्याचा संचार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात वसाहती वाढल्या आहेत. यातून या भागातील रहिवाशांना सर्वाधिक धोका आहे. येत्या काळात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले न गेल्यास नाशिक शहरासारख्या घरांमध्ये बिबट्या शिरण्याचे प्रकार होण्याची मोठी शक्यता आहे.

सिंह नव्हता, मग पायाचे ठसे मोठे कसे

गुरुवारी बहुरुपा शिवारातील शेतात प्रत्यक्षदर्शीने सिंह व बिबट्या हे दोन्ही वन्यजीव बसून असल्याचा दावा केला होता. वनविभागाच्या पथकाने याठिकाणी भेट दिल्यानंतर तातडीने घटनेचा आढावा घेण्यासाठी वनविभागाचे पथकही दाखल झाले होते. या पथकाने पायांचे ठसे घेतले होते. यातील एका प्राण्याच्या पायाचे ठसे हे सामान्यापेक्षा मोठे असल्याचे दिसून आले आहे. प्राण्यांच्या पायाचे ठसे त्याच्या वजनावरून समजते. नर बिबट्याचे वजन हे साधारण ७५ किलोपर्यंत असते. त्याची उंची ही चार फुटांपेक्षा अधिक नसते. यामुळे त्यांच्या पायाचा ठसा कमी व्यासाचा असतो. मादी बिबट्याचे वजन हे ३४ किलोपर्यंत असू शकते. वयोमानानुसार त्यांचे वजन कमी अधिक असले तरी १२५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या प्राण्याच्या पायाचे ठसे बहुरुपा शिवारात आढळून आले असल्याचे समोर आले आहे. यामुळे ही घटना वनविभागाने गांभीर्याने घेणे आवश्यक झाले आहे.

वनविभागाकडून शुक्रवारी सकाळी कॅमेरे तपासून पुन्हा लावले असल्याने येत्या दोन दिवसांत निश्चित काय ती माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

याबाबत तळोदा मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक पी. के. बागुल यांना संपर्क केला असता, आढळून आलेले पायाचे ठसे हे सिंहाचे नसावेत. परंतु, ट्रॅप कॅमेरे लावून तपासणी करत आहोत. वन्यप्राणी एका ठिकाणी थांबत नसल्याने त्यांचा माग काढणे पावसाळ्यात कठीण जाते.