शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात नंदुरबारात काँग्रेसतर्फे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सायकल रॅली, बैलगाडीवर दुचाकी ठेवून आणि शासनाच्या निषेधाच्या विविध घोषणा देत काँग्रेसतर्फे गुरुवारी ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.नंदुरबारात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. आमदार रघुवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी सायकल चालवत शहरातील विविध भागातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सायकल रॅली, बैलगाडीवर दुचाकी ठेवून आणि शासनाच्या निषेधाच्या विविध घोषणा देत काँग्रेसतर्फे गुरुवारी ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.नंदुरबारात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. आमदार रघुवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी सायकल चालवत शहरातील विविध भागातून तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा नेण्यात आला. यावेळी बैलगाडीवर दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पेट्रोल व डिङोलचे दर शंभरी गाठू पहात आहेत. वाढलेल्या इंधन दरामुळे                  महागाई देखील वाढत आहे.               यामुळे सर्वसामान्य जनता हैराण  झाली आहे. इंधन दरवाढीचा              फटका विविध घटकांवर होत आहे. केंद्र व राज्य शासन इंधन दरवाढ रोखण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. यापुढेही तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव मोरे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल वसावे, पालिका सभापती कैलास पाटील, नंदुरबार विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, नगरसेवक दिपक दिघे, परवेजखान यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.तळोद्यात निवेदनतळोद्यात सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा यांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, जितेंद्र माळी, संदीप परदेशी, प्रकाश ठाकरे, पंकज राणे, बापू कलाल, रईस अली, अरविंद मगरे, योगेश पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते.