शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलने देवमोगरा यात्रेला जाणाऱ्या दोघा भाविकांना ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:33 IST

नंदुरबार : शिरपूर तालुक्यातील गुजरात राज्यातील देवमोगरा येथे याहामोगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांना ट्रकने चिरडल्याने ते जागीच ठार ...

नंदुरबार : शिरपूर तालुक्यातील गुजरात राज्यातील देवमोगरा येथे याहामोगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांना ट्रकने चिरडल्याने ते जागीच ठार झाले़ गुरुवारी मध्यरात्री हा अपघात घडला़भांगरबर्डी ता़ शिरपूर येथून सिंगा चैत्राम पावरा (४४) व दिलवरसिंग शेगा पावरा (३५) हे गावातील इतरांसोबत देवमोगरा यात्रेसाठी दुचाकीने निघाले होते़ गावातील इतर कुटूंबिय हे पिकअप वाहनात तर हे दोघेही दुचाकीने पुढे जात होते़ दरम्यान डामरखेडा ता़ शहादा गावाजवळ समोरुन येणाºया ट्रकने त्यांना धडक दिली़ यात दोघेही जागीच ठार झाले़ मागून येणाºया इतर यात्रेकरुंना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ट्रकचालकास रोखण्याचा प्रयत्न केला़ परंतू ट्रकचालक फरार झाला़ दोघांचेही शहादा येथे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ याबाबत कुणाल गोटू पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत़ फरार ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहेत़अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी यात्रेकरुंना मदत करुन शहाद्याकडे रवाना केले होते़ गुजरात राज्यातील देवमोगरा येथे भरणाºया याहामोगी मातेच्या यात्रोत्सवासाठी धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव जातात़ विविध वाहनांनी जाणारे बरेच यात्रेकरु रात्रीच्यावेळीच प्रवास करणे पसंत करतात़ यामुळे त्यांच्या वाहनांना मार्ग दाखवण्यासह विविध उपाययोजना करण्याची गरज आहे़ काही भाविक हे नवस फेडण्यासाठी पायी प्रवास करतात़ त्यांनाही वाहनांनी धडक देत अपघात घडल्याचे प्रकार गेल्यावर्षी घडले होते़ यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी संबधित विभागाने योग्य ती कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़