शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरटे जेरबंद

By admin | Updated: January 20, 2017 00:27 IST

चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रय}ात असताना एकास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले.

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरात चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रय}ात असताना एकास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्याच्याकडून 15 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करून मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न  झाले आहे.जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांना तळोदा तालुक्यात मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या टोळीवर गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लक्ष ठेवून होते. टोळीतील एकाला तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरात मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रय}ात असताना त्यास सापळा लावून पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याला चोरीसाठी मदत करणारे दोन व मोटारसायकल विक्रीसाठी हस्तक म्हणून काम करणारा एक अशा तीन आरोपींची माहिती दिली. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. चारही आरोपींनी गुन्ह्यांची कबुली देत नंदुरबार शहर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा या भागातून तसेच गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून व धुळे जिल्ह्यातून 15 मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली. या 15 मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही गहाण ठेवल्या होत्या तर काही अल्पदरात विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीकडून अजून काही चोरीच्या मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, हे.कॉ. रवींद्र लोंढे, पंढरीनाथ ढवळे, चंद्रकांत शिंदे, विकास पाटील, अनिल गोसावी, रवींद्र पाडवी, योगेश सोनवणे, दीपक गोरे, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, मुकेश अहिरे, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, पुष्पलता जाधव, विकास अजगे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, किरण पावरा, राहुल भामरे, पंकज महाले, अमोल पवार, महेंद्र सोनवणे, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.