शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात सर्वाधिक तर नंदुरबार कमी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभेच्या चारही मतदारसंघात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. अक्कलकुवा मतदारसंघात पाच वाजेर्पयत 65.16 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभेच्या चारही मतदारसंघात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. अक्कलकुवा मतदारसंघात पाच वाजेर्पयत 65.16 टक्के, शहाद्यात 62.37, नंदुरबार 53.26 तर नवापूर मतदारसंघात 71.44 टक्के मतदान झाले होते. सहा वाजेर्पयत त्यात आणखी वाढ होणार होती. दरम्यान, 26 उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून शुक्रवार 24 रोजी होणा:या मतमोजणीकडे आता लक्ष लागून आहे. नंदुरबारसह अक्कलकुवा, शहादा व नवापूर या विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामिण भागात सकाळी फारसा उत्साह दिसून येत नव्हता. परंतु दहा वाजेनंतर अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसून येऊ लागल्या. दुपारी मतदानाचा वेग काहीसा मंदावला. चार वाजेनंतर मात्र पुन्हा अनेक मतदान केंद्रांवर रांगा कायम होत्या. शहरी भागात हे चित्र प्रकर्षाने दिसून येत होते. किरकोळ वादमतदानादरम्यान काही ठिकाणी किरकोळ वाद झाले. परंतु स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी शांततेत घेवून लागलीच वाद मिटविण्यात आले. शिवाय पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवल्याने किरकोळ वाद मिटले. रात्री उशीरार्पयत स्ट्राँग रूममध्ये..मतदानानंतर जमा होणारे मतदान यंत्र हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात येत होते. नंदुरबार, शहादा मतदार संघातील मतदान यंत्र वेळेवर पोहचण्याची शक्यता होती. तर अक्कलकुवा मतदार संघातील यंत्र पहाटेर्पयत जमा होणार होती. नवापूरला देखील वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. धडगाव तालुक्यातील मतदान यंत्र हे शहादा, प्रकाशा, तळोदा मार्गे अक्कलकुवा येथे येत होते. त्यामुळे या मतदान केंद्रात उशीर होणार होता. शिवाय नर्मदा काठावरील मतदान केंद्रातून येण्यासाठी देखील मोठी कसरत करीत कर्मचा:यांना यावे लागणार होते. ढगाळ वातावरण व हलका पाऊसजिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात तुरळक पाऊस देखील झाला. अशा वातावरणात मतदानाचा उत्साह ब:यापैकी राहिला. शेती कामांना देखील सध्या विश्रांती असल्यामुळे शेतमजूर, शेतकरी यांनी मतदानासाठी उत्साह दाखविल्याचे चित्र दिसून आले. दिव्यांगांसाठी सोयवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सोय करण्यात आली होती. 750 पेक्षा अधीक व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. अशा मतदारांना थेट मतदान केंद्रांर्पयत पोहचण्यासाठी  वाहन नेण्याची परवाणगी   होती. त्यामुळे दिव्यांग मतदारांची सोय होत  होती. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकुण 2,828 दिव्यांग मतदारांची नोंदणी झालेली  होती. त्यापैकी अनेकांनी आपला हक्क बजावला.

नवापूर मतदारसंघातील तीन मतदान केंद्रावर रात्री आठ वाजेर्पयत मतदान सुरू होते. त्यामुळे या केंद्राची मतदानाची आकडेवारी मिळविण्यासाठी मोठी कसरत होणार होती. नवापूर तालुक्यातील वडखुट, सोनपाडा, मोठे कडवान या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता मतदानासाठी अचानक गर्दी वाढली. परिणामी रांगेतील सर्व मतदारांना उभे राहू देण्यात आले. त्यानंतर आलेल्यांना रांगेत उभे राहू दिले नाही. परिणामी मतदान संपल्यानंतर देखील साधारणत: दोन ते अडीच तास जास्त वेळ या केंद्रांवर मतदान सुरू होते. रांगेतील सर्वाना मतदान करू देण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सांगितले. 

नादुरूस्त ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या जागी पर्यायी सोय..

अक्कलकुवा मतदार संघातील त्रिशुलचा मोजरापाडा येथील मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटची अडचण निर्माण झाली. मतदान सुरू झाल्यानंतर व्हीव्हीपॅट सुरुच होत नव्हते. त्यामुळे तेथील मतदान केंद्राधिकारी यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला. पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या पर्यायी ठिकाणी तातडीने व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले.  या निवडणुकीत व्हीव्हीपॅटची समस्या सर्वाधिक दिसून आली. तर ईव्हीएममशीनच्या तक्रारी किंवा समस्या अवघ्या दोन ते तीन ठिकाणी निर्माण झाल्या होत्या. त्या देखील लागलीच सोडविण्यात आल्या. जिल्ह्यातील चार मतदारसंघ मिळून एकुण इव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या दहा टक्के अतिरिक्तत मशीन राखीव ठेवण्यात आले होते. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बदलासाठी लागलीच यंत्रणा सजग ठेवण्यात आली होती. 

जिल्ह्यात चार मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील तर 42 मतदान केंद्र हे उपद्रवशील म्हणून घोषीत करण्यात आले होते. अशा ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह बाहेरील कर्मचारी अशा ठिकाणी तैणात करण्यात आले होते.जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी, 855 होमगार्ड तसेच चार राखीव कंपन्या असा प्रचंड बंदोबस्त तैणात करण्यात आलेला होता. सर्वाधिक बंदोबस्त हा अक्कलकुवा मतदारसंघात 339 पोलीस व 251 होमगार्ड आणि एक राखीव तुकडी असा होता.