लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : जानेवारी अखेर मुदत संपणा-या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आल्याने या ग्रामपंचायतींची लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे. सर्वाधिक २९ ग्रामपंचायती या अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात लवकरच पुन्हा राजकीय हालचाली या माध्यमातून सुरू होणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्याची जगभर पसरलेल्या कोविड १९ हा साथीचा रोग देशात तसेच महाराष्ट्रात संक्रमित होत असलेल्या निवडणूक आयोगाने पुढील आदेश पावेतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. जानेवारी ते जून २०२१ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जशा जश्या संपतील तस-तसे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आदेश काढला आहे. जानेवारी २०१९ अखेर मुदत संपून प्रशासक नेमल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये शहादा तालुक्यातील वडछिल व शोभानगर या दोन ग्रामपंचायतीच्या सहभाग आहे. तर तळोदा तालुक्यातील धनपूर, रांझणी,अलवान,कोठार रतनपाडा, सावरपाडा, रामपूर, तऱ्हावद, गंगानगर, जीवननगर, सिलिंगपूर, खर्डी खुर्द,बेलपाडा, अमोनी, अंमलपाडा, खूषगव्हाण, खर्डी बुद्रूक, धवळीविहीर, रापापूर, चौगाव खुर्द या २० ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. अक्कलकुवा तालुक्यातील आमली, आंबाबारी, ब्रिटिश अंकुशविहिर, दहेल ,गंगापूर, गव्हाळी, गुलीउंबर, होराफळी, हुणाखांब, जमाना, जांभीपाणी, काकडखुंट,कौली, खडकापाणी, खटवानी, कोराई मोगरा,मोरखी, नवानागरमुथा, नवापाडा, रामपूर, रायसिंगपूर, साकलीउमर सल्लीबार, सरी, तालंबा, ठाणाविहीर, उदेपुर, वालांबा या २९ ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. धडगाव तालुक्यातील छापरी, खडक्या, सोन बुद्रुक, नंदलवड, राडीकमल, मनखेडी बुद्रुक, पालखा, तलई, मोख खुर्द, मोख बुद्रुक, चिखली वेलखेडी, अस्तंबा रेवेन्यू, पाडामुंड, सुरवाणी, भूजगाव,गोरंबा, मोडलगाव, असली, खांडबारा या २१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील कडवान मोठे, कडवान लहान, करंजी बुद्रुक, कामोद, खानापूर, चितवी, दापूर, देवळीवाडा(चि), नगारे, निजामपूर, निमदर्डा, बिलमांजरे, मेहंदीपाडा, मोवलीपाडा, वडसत्रा, वागदी या १९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या निवडणुका मार्च महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशाकीय तयारी सुरू करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात होणार रणधुमाळी... प्राशसक नियुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक ही मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने फेब्रुवारी महिन्यात मतदार यादी अंतीम करणे व इतर प्रशासकीय बाबींना सुरुवात होऊ शकते. सद्य स्थितीत ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. त्यातील २३ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. ६४ ठिकाणी निवडणुका सुरू आहेत.