ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 23 - पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका नंदुरबारवासीयांना बसत आहे. तीन रुपये अधिभारासह नंदुरबारातील उड्डाणपुलांसाठी झालेला खर्च भरून काढण्याकरीता लीटरमागे 90 पैसे अधिभार असा एकूण तीन रुपये 90 पैशांचा अधिभार शहरवासीयांना सोसावा लागत आहे. त्यामुळे नंदुरबारात पेट्रोल 77 रुपये 59 पैसे लीटर दराने मिळत आहे.पेट्रोलवर तीन रुपये अधिभार लागू करण्यात आल्याने पेट्रोलचे दर सर्वत्र वाढले आहेत. प्रत्येक शहरात पेट्रोलच्या किंमती काही पैशांनी कमी-जास्त आहेत. नंदुरबारात देखील राज्य शासनाच्या आदेशानुसार तीन रुपये प्रति लीटर भाव वाढविण्यात आले असले तरी आणखी 90 पैशांचा भरुदड शहरवासीयांना सोसावा लागत आहे. नंदुरबारात 13 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलांच्या खर्च भरून निघण्यासाठी आधीच पेट्रोल व डिङोलवर लीटरमागे 90 पैसे अधिभार लावण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या अर्थात शहराच्या हद्दीबाहरेच्या तुलनेत शहरात पेट्रोल 90 पैशांनी महाग असते. त्यामुळे राज्य शासनाने आता तीन रुपये अधिभार लावला असला तरी तो नंदुरबारकरांसाठी चार रुपयेच गणला जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल 77.59 पैसे प्रति लीटर दराने मिळत आहे. ते इतर शहरांच्या तुलनेत जास्तच आहे.
सर्वाधिक महाग पेट्रोल नंदुरबारात
By admin | Updated: April 23, 2017 17:17 IST