शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोरंबा-होराफळी रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 11:36 IST

अपूर्ण काम : घाटातील रस्ता असताना संरक्षण भिंती नाही, दरडच्या दगडांमुळे वाहतुकीस अडथळा

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाटसेक्शनच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असून घाटसेक्शनचा रस्ता असतानाही आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधलेल्या नाहीत. पावसाळ्यात जागोजागी कोसळलेली रस्त्यावरील दरड ‘जैसे थे’ पडून असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत असून हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मोरंबा-कुंडी ते होराफळी रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे  झाल्याने  रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पाणी निघण्यासाठी चारी बनविलेली नसल्याने डोगरांचे उतार पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर चढ-उताराचे मोठमोठे खड्डे पडून वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत. खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले नसल्याने रस्त्यावरून ये-जा करणा:या वाहनांमुळे उडणारे धुळीचे कण डोळ्यात जाऊन अपघात घडू शकतो. घाटसेक्शनचा रस्ता असतानाही आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधल्या नसल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ता धोकेदायक झाला आहे. पावसाळ्यात  कोसळलेली दरडदेखील ‘जैसै थे’च असून ग्रामस्थांनी वाहने निघतील असे दगड-गोटे व माती सरकवली. मात्र मोठमोठे दगड तसेच पडून असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी याकडे लक्ष देवून रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणासह आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे करून वाहनधारकांचे होणारे   हाल थांबवावेत, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे.