शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर अर्थव्यवस्थेत अधिक पारदर्शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 11:05 IST

अर्थतज्ज्ञ अनील बोकील : उद्योग-व्यवसायांतील उलाढाल बँकांशी जोडाव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : भारतीय अर्थव्यवस्था ही करदात्यांवर अवलंबून आह़े देशातील उद्योग व्यवसायांची उलाढाल बँक व्यवहाराशी जोडल्यास अर्थव्यवस्थेत अधिक पारदर्शकता निर्माण होईल असे प्रतिपादन जेष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी केल़े शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शहादा तालुका व्यापारी महासंघातर्फे जीएसटीवर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होत़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील जिल्हा व्यापारी असोसिएशन महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग उपस्थित होत़े या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, डॉ़ कांतीलाल टाटीया, शहादा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल शर्मा, महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद्र चोरडीया आदी उपस्थित होत़े पुढे बोलताना बाकील म्हणाले की, जीएसटी कराबाबत विचार तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनच सुरु झाला होता़ जीएसटी करप्रणाली स्विकार करणारा इंडोनेशीया हा पहिला देश असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितल़े करबुडव्या व्यापा:यांबाबत ते म्हणाले की, ग्राहकाचे हित हे व्यापा:यांचे प्रथम दायित्व असत़े परंतु काही व्यापा:यांकडून ग्राहकांना गृहीत धरण्यात येत असत़े पैसा कमविण्याच्या उद्देशाने करचोरीचे प्रकार घडून काळया पैशांची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितल़े व्यवस्था ही मानसाला संस्कृत व विकृतदेखील बनवत असत़े त्यामुळे व्यवस्था बदलली की माणसातही बदल घडत असतात़ अर्थशास्त्र हे पैशाचे नव्हे तर संशोधनाचे शास्त्र असल्याचेही त्यांनी सांगितल़े सर्वत्र आर्थिक व्यवहार हे बँकांशी जोडल्यास पारदर्शकता येण्यास मदत होणार आह़े परिणामी याने भारताची अर्थव्यवस्था अधिक सशक्त होण्यास मदत होणार असल्याचा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला़ तसेच अर्थव्यवस्थेसोबतच पर्यावरण संरक्षणावरसुध्दा व्यापक दृष्टीने विचारमंथन होणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवजरून सांगितल़ेकार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल शर्मा यांनी केल़े सूत्रसंचालन व आभार प्रा़ डॉ़ विजयप्रकाश शर्मा यांनी केल़े मनोज भाटीया, विनय गांधी, विजय भावसार, विजय धनकानी, संजय छाजेड, राजेंद्र भावसार, विलास सोनार, अतीश सोनार, वसंत पटेल, नूर मोहम्मद यांच्यासह व्यापारी उपस्थित होत़े