शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर यंदा मध्य प्रदेशात गणेशमूर्तीची अधिक विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा गणेशोत्सवासाठी नंदुरबारातून मोठय़ा प्रमाणावर मूर्ती नेल्या जात आहेत. याशिवाय गुजरातमध्ये देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत मूर्ती नेण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी शेजारच्या या दोन्ही राज्यांनी तारल्याने गणेशमूर्ती कारागिरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.नंदुरबारच्या मूर्ती कारागिरांना यंदा मूर्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा गणेशोत्सवासाठी नंदुरबारातून मोठय़ा प्रमाणावर मूर्ती नेल्या जात आहेत. याशिवाय गुजरातमध्ये देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत मूर्ती नेण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी शेजारच्या या दोन्ही राज्यांनी तारल्याने गणेशमूर्ती कारागिरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.नंदुरबारच्या मूर्ती कारागिरांना यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालावरील जीएसटीचा फटका बसला होता. याशिवाय नंदुरबार, धुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे गणेशमूर्त्ीना मागणीबाबत कारागिरांना चिंता होती. परंतु यंदा मध्यप्रदेश व गुजरातने तारल्याचे चित्र मूर्ती विक्रीतील बाजारात दिसून येत आहे. या दोन्ही राज्यात गेल्या काही वर्षाच्या तुलनेत 15 ते 20 टक्के अधीक मूर्ती नेल्या जात असल्याचे मूर्ती कारागिरांनी सांगितले. मध्यप्रदेशात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे गावोगावच्या मंडळांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष व नेत्यांकडून त्यांना मूर्तीसाठी आर्थिक मदत होत आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील खेतिया, पानसेमल, खरगोन, सेंधवा यासह इतर भागातील मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मूर्ती घेवून जात आहे. साधारणत पाच ते दहा फूटर्पयतच्या मूर्त्ीना मागणी आहे. याशिवाय गुजरातमध्ये देखील यंदा ब:यापैकी मूर्ती नेल्या जात आहेत. यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे मूर्ती कारागिरांच्या व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता असता असतांना या दोन्ही राज्यांनी ब:यापैकी मूर्ती व्यावसायिकांना तारले आहे.