शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात जिल्ह्यात 78 लाख झाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने तृतीय स्थान पटकावत 78 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने तृतीय स्थान पटकावत 78 लाख झाडांची लागवड पूर्ण केली आह़े 1 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान वनविभागाने पुरवलेली रोपे 36 विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात लागवड केली आहेत़    जिल्ह्यासाठी यंदा शासनाने 94 लाख 98 हजार झाडांच्या लागवडीचे उद्दीष्टय़ दिले होत़े यासाठी 94 लाख 75 हजार खड्डे खोदण्यात आले होत़े 1 जुलै पासून जिल्ह्यातील विविध भागात वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या रोपांची लागवड करणे सुरु आह़े गेल्या दीड महिन्यात तब्बल 1 लाख 15 हजार 8 शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी, बँकांचे अधिकारी कर्मचारी, एसटीचे कर्मचारी, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात ही वृक्ष लागवड मोहिम सुरु आह़े सप्टेंबर अखेरीर्पयत ही मोहिम सुरु राहणार आह़े यात वेळेआधीच 85 टक्के लागवड पूर्ण झाल्याने यंदा 100 टक्के उद्दीष्टय़ पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े गत दीड महिन्यात उद्योग विभागाने 800, सार्वजनिक आरोग्य विभागाने 4 हजार 616, सामाजिक न्याय विभागाने 450, गृह विभाग (कारागृह) 1 हजार, शालेय शिक्षण विभाग 34 हजार 75, क्रीडा विभागा 95, पशुसंवर्धन विभाग 4 हजार 250, अर्थ विभागाने 2 हजार 700, कोषागार विभागाने 1 हजार, वनविभाग 45 लाख 30 हजार 4, आदिवासी विकास विभाग 48 हजार 610, सामाजिक वनीकरण विभाग 19 लाख 46 हजार 280, ऊर्जा विभाग 1 हजार 647, पोलीस दलाकडून 3 हजार 450, राज्य उत्पादन शुल्क विभाग 360, शहरी विकास विभाग 3 हजार 700, कृषी विभाग 1 लाख 74 हजार 648, ग्रामपंचायत विभाग 10 लाख 2 हजार 20, एसटी महामंडळ 300, मस्त्य उत्पादन विभाग 1 हजार 450, तांत्रिक शिक्षण विभाग 750, सार्वजनिक बांधकाम विभाग 30 हजार 880, ग्रामविकास विभाग 3 हजार 426, जलसंधारण विभाग 710, महसूल विभाग 600, सहकार व पणन विभाग 1 हजार 852 आणि महिला बालविकास विभागाने 1 हजार 692 झाडांचे रोपण जिल्हाभरात केले आह़े 

वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी आणि ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड चळवळीत यंदा मोठे योगदान दिले आह़े तीन विभागांसह जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी 100 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान दिले आह़े राज्यात आतार्पयत सर्वाधिक वृक्ष लागवडीत अकोला जिल्ह्याने 94 टक्के काम पूर्ण केले आह़े त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर नाशिक, दहाव्या क्रमांकावर धुळे तर 12 क्रमांकावर नंदुरबार जिल्ह्याने स्थान पटकावले आह़े बुलढाणा आणि ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्याला मिळालेले उद्दीष्टय़ हे अधिक असल्याने येत्या काळात वृक्षलागवडीच्या बाबतीत नंदुरबार राज्यातील पहिल्या दहामध्ये दिसेल अशी चिन्हे आहेत़ जिल्ह्यात आतार्पयत 85़32 टक्के वृक्षांची लागवड पूर्ण झाल्याची माहिती वनविभागाने दिली आह़े 

जिल्ह्यात 6 हजार 698 नोंदणीकृत ठिकाणांवर वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती आह़े पूरामुळे यातील बरेच खड्डे आणी त्यात लावलेली झाडे पाण्यात गेली होती़ गत आठवडय़ापासून वनविभागाचे पथक या झाडांचा शोध घेत त्याठिकाणी नवीन झाडांचे रोपण करत आह़े परंतू पुरामुळे 1 टक्क्यापेक्षा कमी रोपांना फटका बसल्याची माहिती देण्यात आली आह़े जवळजवळ सर्व ठिकाणी रोपे सुरक्षित आहेत़