शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याने मान्सून फेस्टिवल रद्द : सरदार सरोवर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 10:35 IST

जगातील सर्वात उंच स्टॅच्यूचे काम अंतिम टप्प्यात

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचंड घाईगर्दी करून गुजरात सरकारने सरदार सरोवर प्रकल्पावर गेट बसवून प्रकल्पाची उंची 138 मीटर्पयत पूर्ण केली असली तरी गेल्या दोन वर्षात पाणीच नसल्याने हा प्रकल्प अद्यापही भरलेला नाही. परिणामी या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने सुरू केलेला मान्सून फेस्टिवल सलग दुस:या वर्षी रद्द करावा लागला आहे. दरम्यान, जगातील सर्वात उंच स्टॅच्यूू उभारण्याचे काम या ठिकाणी अंतिम टप्प्यात असून 31 ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण करण्यासाठी तयारी सुरू आहे.महाकाय सरदार सरोवर प्रकल्प हा सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. या प्रकल्पामुळे लाभहानीच समीकरण तथा पर्यावरणाची हानी आणि पुनर्वसन हे विषय जागतिक स्तरावर गाजले. परंतु सर्व संघर्षानंतर व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून हा प्रकल्प अखेर पूर्ण रेटला आहे. या प्रकल्पाची उंची कमी करण्याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने लढा दिला. पण, त्यानंतरही प्रकल्पाची उंची 138 मीटर्पयत पूर्ण करण्यात आली आहे. पण धरणाची उंची पूर्ण झाल्यापासून अर्थात धरणावरील गेट बसविल्यापासून हा प्रकल्प मात्र अद्यापही पूर्ण भरलेला नाही. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने हा प्रकल्प जवळपास दहा मीटरने खाली होता. यावर्षीदेखील या प्रकल्पात आतार्पयत 121.67 मीटर्पयतच पाणीसाठा झाला आहे. अजून 16 मीटरपेक्षा अधिक हा प्रकल्प रिक्त आहे. प्रकल्प भरला नसल्याने या ठिकाणी धरणावरून फेसाळणा:या धबधब्याचे मनोहारी दृष्य गेल्या दोन वर्षापासून लुप्त झाले आहे. यापूर्वी या धरणाची उंची 121.85 मीटर असताना पावसाळ्यात धरणाच्या भिंतीवरून पाणी कोसळत होते. अक्षरश: नायजेरिया  धबधब्याची प्रचिती येथे पर्यटकांना येत होती. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही प्रचंड    राहत होती. त्याची नोंद घेत गुजरात सरकारनेही 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर  असा महिनाभर मान्सून फेस्टिवलचे आयोजन सुरू केले होते. पण दोन वर्षापासून हा फेस्टिवल रद्द झाला आहे.पाण्यामुळे फेस्टिवलच रद्द झाला नाही तर प्रकल्पाची वीजनिर्मिती देखील थांबली आहे.सरदार सरोवर प्रकल्पाजवळच स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा 182 मीटर उंचीचा  भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकसित करण्याचे काम गुजरात सरकारने सुरू केले आहे. या पुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून साधारणत: येत्या 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी हा स्टॅच्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे प्रय} सुरू आहेत. या स्टॅच्यूसाठी सर्व भाग ब्रांझपासून तयार करण्यात आले असून ते चीनमधून तयार करून येत आहेत. एक एक भाग आणल्यानंतर तो जोडला जात आहे. या स्टॅच्यूच्या ठिकाणी एखाद्या महाबेटासारखे वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी बोटिंग व अन्य सुविधाही करण्यात येणार आहेत. याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हॉटेलही उभारली जात आहे. बडोदा ते सरदार सरोवर प्रकल्पार्पयत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय विमानतळही उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे एकूणच हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या दृष्टीनेच विकसित होत आहे. साहजिकच सध्या ओस पडलेली पर्यटकांची गर्दी स्टॅच्यूच्या लोकार्पणानंतर पुन्हा या ठिकाणी वाढणार आहे.हा स्टॅच्यू आकारास आल्यानंतर जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ठरणार आहे. सध्या सर्वात उंच स्टॅच्यू चीनमधील स्प्रिंग टेम्पल बुद्धा हे आहे. त्याची उंची 153 मीटर आहे. त्या पाठोपाठ जपानमधील उशीकु दाईबुत्सू याची उंची 120 मीटर आहे. रशियातील द मदरलॅन्ड कोल्स  याची उंची 85 मीटर आहे तर  यूएसए मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची 63 मीटर आहे. त्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे 182 मीटर उंचीचे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ठरणार आहे. या स्टॅच्यूच्या ठिकाणी एकाचवेळी 15 हजार पर्यटक थांबू शकतील. एका वेळी 200 लोकं जाऊ शकतील.