शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाच्या परिसरात मोकाट कुत्रे आणि काटेरी झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:26 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या आजारांची लागण होणे असे प्रकार सुरू आहेत. नंदुरबार पालिकेमार्फत मात्र जलकुंभांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी नियमित जलकुंभ स्वच्छ केले जात असल्याचा दावा पालिकेचा आहे. परंतु ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मात्र काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्याकडे पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्प व आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणाहून आलेल्या पाईपलाईनमधून साक्रीनाका, शांतीनगर व संजय नगर या मोठ्या जलकुंभात पाणी साठवण करून इतर १२ लहान जलकुंभात ते नेले जाते. त्या माध्यमातून शहरातील साधारणत: १६ हजारांपेक्षा अधिक नळजोडणीधारकांना आणि शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, शासकीय वसतिगृह यांना पाणीपुरवठा केला जातो. शहराची आगामी अर्थात २०४० पर्यंतच्या लोकसंख्येला अनुसरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. आजारांचे मूळ कारण अशुद्ध पाणी हेच आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सर्वच १५ जलकुंभ हे दर २० ते २५ दिवसात स्वच्छ केले जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. रहिवासी वस्तीत असलेल्या जलकुंभांच्या परिसरात काही नागरिक अस्वच्छता करतात, तेथेच पाणी भरण्यासाठी येणे आणि कपडे धुणे असे प्रकार करतात. ते होऊ नये यासाठी शांतीनगर व संजयनगर जलकुंभ परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साक्रीनाका जलकुंभाच्या परिसरात आणखी उपाययोजना आवश्यक आहे. इतर जलकुंभ हे नवीन व उंचावर असल्याने तेथे कुणी जाऊ शकत नाही.पावसाळ्यात पाईपलाईन लिकेज होणे, व्हाॅल्व्ह नादुरुस्त होणे असे प्रकार होत असल्यामुळे काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा होतो. परंतु तो देखील वेळीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न असतो. अस्वच्छता आणि अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.