शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोदीसाहेब चहा आवडला, आता लायसनही द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:01 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माङया चहाचे कौतुक केले, त्यातच माझा ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माङया चहाचे कौतुक केले, त्यातच माझा चार दशकातील श्रमाचे सार्थक झाले आहे. आता माङया चहाची चर्चाच सुरू झाली आहे तर पंतप्रधान साहेबांनी मला रेल्वेस्थानकावर चहा विक्रीचे लायसन द्यावे, एवढीच हात जोडून विनंती आहे.’ ही प्रतिक्रिया आहे येथील चार दशकांपासून रेल्वेत चहा विक्री करणा:या रामदास चौधरी या वृद्ध विक्रेत्याची.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातच नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेविकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सने चर्चा करताना नंदुरबारच्या चौधरी चहाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून येथील चौधरी गल्लीत राहणारे रामदास चौधरी हे चर्चेत आले. शुक्रवारी पुन्हा पंतप्रधानांनी शिर्डी येथे घरकूल वाटपाच्या कार्यक्रमात नंदुरबारच्या लाभाथ्र्याशी व्हीडीओ कान्फरन्सने संपर्क साधताना चौधरी चहाचे कौतुक केल्याने या चर्चेत अधिकच भर पडली आहे.नंदुरबारमधील चौधरी गल्लीत रामदास चैत्राम चौधरी हे 70 वर्षीय वृद्ध राहतात. गेल्या 41 वर्षापासून ते रेल्वेत चहा विक्रीचा व्यवसाय करतात. रोज पहाटे साडेपाच वाजता घरुन चहाचे कॅन भरुन नंदुरबार स्थानकावरून हावडा एक्सप्रेसने सुरतकडे जातात. रेल्वेतच ‘चौधरी चहा’च्या नावाने चहा विक्री करतात. प्रवासीदेखील त्यांच्या चहाची प्रतीक्षाच करीत असतात. दुपारी तीन वाजता ते पुन्हा रेल्वेत चहा विक्री करीतच सुरतहून नंदुरबारला परततात. हा त्यांचा नित्याचा उपक्रम. या फेरीत किमान 40 लीटर चहाची विक्री ते करतात.गेल्या महिन्यातच दूरदर्शनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी चहाचे जाहीरपणे कौतुक केले होते. तेव्हापासून रामदास चौधरी हे चर्चेत आलेले व्यक्तिमत्व. अतिशय साधे व्यक्तिमत्व, त्यांचा मिशा या लक्षवेधी आहेत. अनेकवेळा रेल्वेत ते ‘मूछवाले चौधरी की चाय’ या नावानेही चहा विक्री करतात. शुक्रवारी पंतप्रधानांनी पुन्हा त्यांच्या चहाचे कौतुक केल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर आता देशभरात चौधरी चहा चर्चेची झाली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, साधारणत: 25-30 वर्षापूर्वी आपण मोदीसाहेबांना नंदुरबार स्थानकावर चहा दिल्याचे आठवते. तेव्हाची आठवण आजही त्यांना असल्याने आपण धन्य झालो. खरेतर या व्यवसायात गेल्या 40 वर्षात आपल्याला काहीच मिळाले नाही. केवळ दोनवेळची गुजराण होते तेवढेच. चहा विक्रीतून दोन पैसे हाती लागतात पण अनेकवेळा निम्मे रक्कम दंड भरण्यातच जाते. आता मोदीसाहेबांनी माङया चहाचे कौतुक केले आहे. हा व्यवसाय आपण सुरू ठेवणारच पण आपल्यानंतर मुलगाही तो चालवणार. माङो तर आयुष्य गेले पण मुलासाठी तरी पंतप्रधानांनी रेल्वेस्थानकावर चहा विक्रीसाठी लायसन दिले किंवा पेन्ट्रीकारमध्ये परवाना दिला तर त्यांचे आपण कायम ऋणी राहू, असे त्यांनी सांगितले.रामदास चौधरी यांचे दोन मुले, पत्नी, सुना असा परिवार आहे. त्यापैकी एक मुलगा सुरेश हा त्यांना या व्यवसायासाठी मदत करतो. त्यांच्यासकट एक रोजंदारी मजूर त्यांनी लावला आहे. पहाटे चार वाजता उठून घरी ते स्वत:च चहा बनवतात. त्यांच्या चहाची चव एकच राहिली आहे. त्याच्यात दूध, साखर, चहाचे प्रमाण एकसारखे ठेवले आहे. त्यात मसालादेखील ते स्वत: बनवतात. त्याचेही प्रमाण चार दशकांपासून सारखेच ठेवले आहे. या कामात त्यांना त्यांची पत्नी मदत करते.